अर्जुनी गावात तसेच गाव लगत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करा: जगदीश पेंदाम

वरोरा तालुक्यातील स्थानिक शेगाव बू. येथून जवळच असलेल्या अर्जूनी तुकुम हा गाव जंगल लगत असून या गावात गेल्या अनेक वर्षापासून विकास कामे तसेच दळण वळण ची सुख सोई चा अभाव आहे तसेच अनेक वर्षा पासून या गावातील तसेच परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे शिवाय जंगल लगत असलेल्या शेती मध्ये जण्या करिता रोड रस्ता नाही तसेच जंगलात असलेल्या भानुसखिंडी धर्मस्थळी जाण्यासाठी मार्ग नाही . तसेच अर्जूनिं ते वायगाव भो. या मार्गाची दयनीय अवस्था असून याकडे संबधित विभाग जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून नागरिकांना व शेतकऱ्यांना भूलथापा देतात. याच सोबत विद्याअर्जन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील मुख्य सोईचा मार्ग नसल्याने मुला मुलींना पायवाट करून शिक्षण घ्यावे लागते असे अनेक समस्याने ग्रासलेले अर्जुनी गाव समस्या मुक्त केव्हा होणार या करिता येथील ग्राम पंचायत चे सदस्य श्री जगदीश पेंदाम यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग चे उपविभागीय अधिकारी श्री झाडे साहेब यांना प्रत्यक्ष भेट घेऊन गावाची समस्या मांडली तेव्हा तुमच्या मागणीला अधिक लक्ष देऊन गावातील रस्ते तात्काळ डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
अर्जुनी तु ग्राम.पं. सदस्य जगदीश पेंदाम यांनी जि.प.बांधकाम उपविभागाचे अधिकारी झाडे साहेब यांच्याशी गावातील व परिसरातील रस्त्याबद्दल मागणी करत लवकरात लवकर रस्त्याची बांधकाम करण्यासाठी चर्चा करण्यात आली यामध्ये सर्वोदय विद्यालय ते फॉरेस्ट नाका पर्यंत डांबरीकरण करणे तसेच तुकुम ते शिवनी पूल रस्त्याचे खडीकरण करणे अर्जुनी ते वायगाव भोयर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.