नामा म्हणे, आता लोपला भास्कर! अरुण बाप, ज्ञानेश्वर समाधीस्थ!


……….…………………………..
आज रोजी माऊली ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी घेतली अनेक शतके होऊन गेली. पण त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार वाढतोच आहे. किंबहुना त्यांच्या विचाराची गरज आज सुद्धा समाजाला आहे.माऊली ज्ञानेश्वरांच्या साहित्यातील प्रगल्भता तसुभरही कमी झाली नाही. व तसे बघता माऊलींना मराठी भाषेची जननी म्हणून संबोधले जाते. त्यांच्या मराठीच्या अनेक ग्रंथामुळे च मराठी भाषा समृद्ध झाली. बिंबवल्या गेली टिकली आणि रुजली व समृद्ध झाली.
एखादा शुभ प्रसंग असल्यास त्या शुभ प्रसंगात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पत्रिका व आग्रहाचे आमंत्रण सुद्धा द्यावे लागते पण माऊलीच्या समाधी संजीवन सोहळा आहे. त्या ठिकाणी कधी कुणाला आग्रहाचे आमंत्रण नसते. तरी पण हजारो भाविक त्या ठिकाणी लीन होतात यावरून माऊलीची भक्ती कळते. चौदाशे वर्ष तपस्या करणाऱ्या श्री संत चांगदेवांना प्रचंड गर्व होता. ज्यांचे जवळ रिद्धी आणि सिद्धी लिंन होत होत्या पण बालक असलेले माऊली ज्ञानेश्वर माझ्यासमोर काय टिकणार असा अविरत भाव त्यांच्या मनात होता. आणि माऊलींनी चांगदेवांना पत्र पाठवले त्या पत्राला उत्तर सुद्धा चांग देवांना देता आला नाही व तिथेच गर्वहरण झाले त्यांचा गर्वहरण माऊली ज्ञानेश्वरांनी सुद्धा केला असता पण आदिशक्ती ,स्त्रीशक्तीला, आराध्य म्हणून संत मुक्ताबाईंना आज्ञा दिली व काही वेळातच संत चांगदेव मुक्ताबाई चरणी लिन झाले. असा मोठ्या मनाचा प्रत्यय ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ठिकाणी आणून दिला व स्त्रीला सातशे वर्षांपूर्वी सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे .असा संदेश माऊलींनी सर्वसामान्यांना दिला. भूलोकी परमेश्वराची मान दियाळी निर्माण केली मराठी वाङ्मयाची फार मोठी भव्य दिव्य असलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी की ज्यामध्ये एकूण ९०३० ओव्या आहेत.
“भाव धरूनिया वाचे ज्ञानेश्वरी !!कृपा करी हरी तयावरी नामा म्हणे! ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी!! एक तरी ओवी अनुभवावी!”
दिनांक12 ऑगस्टमध्ये तपस्वी श्री ज्ञानदेव महामेरू असणारे उदयास आले. ज्यांना वयाच्या विसाव्या वर्षी पर्यंत केवळ शिक्षणाचे ज्ञान असते. पण माऊलींनी वयाच्या विशी पर्यंत ज्ञानाचे भांडार उभे केले होते. व अनेक वेदांचे पाठांतर सुद्धा केले होते. व रेड्यामुखी वेद बोलविला होता . मराठी साठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. व त्यांच्याबद्दल आज तागायत आस्था कायम आहे व ते ज्ञानेश्वरी या ग्रंथरूपात आसनस्थ आहे देह कष्टविले परोपकारे अशी त्यांची सद्भभावना होती. महाराष्ट्र देश खूप भाग्यवान समजावा की जिथे माऊली ज्ञानेश्वर यांसारखे संत होऊन गेले.
“ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी गीतेची टीका माऊलींनी सकल मराठी भाषा समृद्ध केली श्री संत नामदेवाचा कालखंड सुद्धा हाच होता त्यानिमित्ताने सर्व संतांनी तीर्थयात्रा केल्यानंतर श्री पंढरीच्या विठोबाचे दर्शन घेतले आणि आपले ज्येष्ठ बंधू संत शिरोमणी निवृत्तीनाथ यांचे जवळ ज्ञानेश्वर माऊली यांनी आपली समाधी संजीवनाची इच्छा बोलून दाखवली हे ऐकून नामदेवराय व संत निवृत्तीनाथ यांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत होत्या पण ज्ञानेश्वर माऊली आपल्या निर्णयावर ठाम होते. आणि श्री क्षेत्र आळंदी येथे समाधी घेण्याचे निश्चित झाले खरोखरच काय भाग्यवान भूमी असेल की जिथे माऊलीने संजीवनी समाधी घेतली धन्य धन्य ती शिळा जिथे लाभले माऊलींचा सुवास. या निर्णयामुळे हजारो भाविक श्री क्षेत्र आळंदी येथे जमले कारण माऊली ज्ञानेश्वरा सारखी दिव्य विभूती दृष्टी समोरून लुप्त होणार म्हणून अनेकांचा जीव कासावीस होत होता.”प्राणमन तळमळी जैसी, का मासोळी.! जीवनाविना”अशी विचित्र अवस्था गुरुबंधू ची होत होती. आणि बालवयातच घेतलेल्या निर्णयामुळे बंधू ची अवस्था व्यथित पणाची झाली होती. व अश्रूंचा बांध यानिमित्ताने फुटला होता.
“नामा म्हणे यांनी तारिले पतीत! भक्ती केली प्रसिद्ध ज्ञानदेवी!”
ज्या ठिकाणी समाधी घेणार त्या भू कडे माऊलीने प्रयाण केले मागेपुढे संत पताकांचे भार व मध्यभागी माऊली असती, समाधी स्थित भू मातेला माऊलींनी वंदन केले. व विवराला प्रदक्षिणा घालून जमलेल्या सर्व वारकरी वृंदास, व संप्रदायाला नम्रतेने नमस्कार केला व ज्या ठिकाणी समाधी घेणार ते ठिकाण बेलफुल यांनी सजवले होते व आसनावर ज्ञानोबाराय पद्मासन घालून विराजमान झाले आणि पाहताक्षणी एक दिव्य प्रकाश लुप्त झाला.
“नामा म्हणे संत कासावीस लावी ती पदर डोळी यासी! नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ”!!, अशा रीतीने मराठीची जननी लुप्त झाली शके १२१८ कार्तिक वद्य त्रयोदशी गुरुवार दिवशी मध्यम काळी माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्या दिवशी दिनांक होता 25 ऑक्टोबर १२९६ .
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर नमस्कार तया वारंवार, यावेळी ब्रह्म असणारे विठ्ठल , माता रुक्मिणीला ज्ञानेश्वर माऊलीचे महत्त्व सांगतात,
“देवो म्हणती रुख्मिणी हा एकच योगी देखीला नयनी हेचि ज्ञान! संजीवनी जाण त्रिलोक्याशी, जो करील याची यात्रा तो सकळ गोत्रा ही सकळही, कुळे पवित्रा याचेनी दर्शन होती.


निरूपण
प्रवीण रमेशराव जोशी
मु. पोस्ट. ढाणकी
ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ
7385266166.