
/राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रात चांगल्याप्रकारे काॅंग्रेस पक्षाची पकड असून नुकतेच असून वसंत जिनिंगच्या बॅंक प्रतिनिधी संचालक पदी कोपरीचे सरपंच तथा युवा कार्यकर्ते मोहन नरडवार यांची निवड काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा राळेगाव तालुका सहकार क्षेत्राचे नेते अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांनी केली असून ते यापुढे संचालक म्हणून कार्य करणार असून त्यांच्या निवडीच्या वेळी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर,काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र महाजन, खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक काचोळे, माजी प. स. उपसभापती शामभाऊ येणोरकर, केशवराव पडोळे, रामभाऊ भोयर, प्रकाश मेहता, सुरेश पेंद्राम , बाळकृष्ण घिनमिने, सुभाष खेडेकर, हनुमान डाखोरे यांचेसह अनेक इतर कार्यकर्ते उपस्थित होते.अशाप्रकारे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने धानोरा जळका जिल्हा परिषद विभागातील पक्षाच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.
