

शिवसेनेकडून आमदार झाल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षाची खासदारकी ची शिट मिळवत मिळवत काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून बा ळुभाऊ धानोरकर निवडून आले होते.केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर यांचा दणदणीत पराभव करीत त्यांनी सर्वांना आश्चर्य चकित केले होते परंतु त्यांच्या मृत्युनंतर ती जागा रिक्त होती
भा जपा मध्ये अतिशय महत्वाचे भुषविणारे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात काँग्रेस ला पाचव्या यादीची वाट पाहावी लागली.दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभाताई धानोरकर यांना उमेदवारी मिळेल की नाही यावर मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली होती अखेर आज 5 व्या यादीनंतर य चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे .
भारतीय जनता पार्टीने माजी खासदार हंसराज अहिर यांना उमेदवारी न देता महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना उमेदवारी दिल्याने ही लढत अधिक चुरशीची झाली आहे
