बांगलादेश येथील हिंदूवर व कलकत्ता येथील डॉ. भगिनी वर झालेल्या अत्याचारा विरोधात ढाणकीत कडकडीत बंद


ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी

गेल्या काही दिवसापासुन बांग्लादेश मध्ये धर्माधांकडुन खुप मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार माजविला जात आहे. धार्मिकतेच्या आधारावर तेथिल हिंदुना लक्ष करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार सुरु आहेत श्रध्दास्थानाची तोडफोड होत आहे. अनेक महिलांचीअब्रू घेऊन , अमानुष छळ होत आहे. तसेच कलकत्ता येथे डॉ. भगिनीवर नराधमांनी क्रूर असा अत्याचार केला त्यास कठोर असे शासन व्हावे याकरिता ढाणकी शहरतील सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद ठेवण्यात आला.भारत मातेचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी कडकडीत आपली प्रतिष्ठान बंद ठेवून सहकार्य केले व बंद पाळला गेला. भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू वर अत्याचार होत आहेत. याचा तातडीने विचार करून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ,भारतात राहणाऱ्या अवैध बांग्लादेशी घुसपैठीया त्यांची ओळख पटवुन लवकरात लवकर भारता बाहेर काढण्यात यावे,
भारत सरकारने बांग्लादेशातील हिंदुच्या सुरक्षितेसाठी ताबडतोच पावले उचलावी वेळ पडल्यास आवश्यक ती कार्यवाही करावी,
बांग्लादेशातील भयावह व असुरक्षीत वातावरणामुळे जिव वाचविण्यासाठी सिमेवर जमा झालेल्या हिंदु समाजासाठी भारत सरकारने छावण्या सुरु करण्यात दयाव्या,
गेल्या काही दिवसात भारतात घडणाऱ्या काही घटणा पाहील्यास असे निदर्शनास येते की, यात जिहादी शक्ती येथे सुप्दा असाच हैदोस माजविण्याच्या प्रयत्नात आहेत अरविंद वैश्य, यशश्री शिंदे ही याचीच उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा घटना थांबविण्यासाठी कठोर कायदे करुन त्याची अंमलबजावणी व्हावी. सकल हिंदु समाज बांग्लादेशातील हिंदुच्या स्थितीने चिंत्तीत असुन भारत सरकारने वरिल मागण्याची गांभिर्याने दखल घेऊन त्यावर योग्य कार्यवाही करावी अशा
मागण्या सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आल्या होत्या. बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.