
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
नगरपंचायत राळेगाव प्रकल्प एक च्या घरकुल लाभार्थ्यांना नगरपंचायत कडे प्राप्त झालेला अनुदानाचा तिसरा हप्ता विनाअडकाठी देण्यात यावा
प्रकल्प दोन मधील 580 घरकुल लाभार्थ्यांच्या घराचे सर्वेक्षण करून त्यांना मालकी उतारे पट्टे देण्याबाबतची कार्यवाही विना विलंब सुरू करावी तसेच
नगरपंचायत कडे चार वर्षापासून प्रलंबित जवळपास 400 प्रस्तावांना विना विलंब मान्यता द्यावी अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा शेकडो घरकुल लाभार्थ्यांची स्वाक्षरी असलेले निवेदन प्रधानमंत्री आवास संघर्ष समितीकडून विद्यमान मुख्य अधिकारी माधुरी मडावी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला निवेदन देते वेळेस संघर्ष समिती सदस्य शंकर गायधने भानुदास महाजन हरिभाऊ ठाकरे मारुती गदई रमेश कोहळे वसंता कोडणे गजानन धान फुले संजय नारायण डंभारे लक्ष्मणराव डाखोरे प्रकाश कळमकर झुंजुर कार टेलर इत्यादी घरकुल लाभार्थी व नगरपंचायत चे पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते केंद्र शासनाच्या 2022 पर्यंत सर्वांना घरकुल योजनेअंतर्गत नगरपंचायत राळेगाव कडून चार वर्षापासून प्रधानमंत्री आवास प्रकल्प दोन टप्प्यात राबवित आहे प्रकल्प एक १७६ घराची मालकी असणारे लाभार्थी तर प्रकल्प दोन सरकारी जागेवर 2011 पर्यंत अतिक्रमण करून राहणारे 580 लाभार्थी व जवळपास नगरपंचायत कडे तीन वर्षापासून घरकुल प्रस्ताव ऑनलाईन मंजुरीसाठी असलेले जवळपास चारशे घरकुल लाभार्थी नगरपंचायत कडून प्रकल्प एक मधील 176 घरकुलापैकी चार वर्षात फक्त 110 घरकुल प्रगतीत आहे लाभार्थ्यांना चार वर्षात अनुदानाचे दोन हप्ते मिळालेले आहे व तिसरे हप्त्याची रक्कम नगरपंचायत कडे प्राप्त झाली आहे हप्ता मिळण्या स विलंब होत असल्यामुळे लाभार्थी पुरते अडचणीत आले आहे तर प्रकल्प दोन मधील पात्र 580 लाभार्थ्यांना चार वर्षापासून उपविभागीय अधिकारी राळेगाव उपअधीक्षक भूमी अभिलेख व नगरपंचायत चे अधिकारी घरकुल लाभार्थ्यांना घर मालकी उतारे देण्यासाठी भूलथापा देत आहे संघर्ष समितीकडून याबाबतीत सर्व यंत्रणांना पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे समिती संयोजक शंकर गायधने यांनी सांगितले प्रकल्प दोन मधील लाभार्थ्यासाठीचा दोन कोटीचा निधी शासनाने परत मागितल्याचे कळते तर जवळपास 4 00 घरकुल लाभार्थी प्रस्ताव ऑनलाईन साठी हरिओम बहुउद्देशीय संस्थेकडे चार वर्षापासून पडून आहे अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे शहरातील आवास योजना रखडली आहे या विरोधात प्रधानमंत्री आवास संघर्ष समितीकडून अनेक वेळा निवेदने विनंती आंदोलनाची भाषा करण्यात आली परंतु अधिकाऱ्यांनी फक्त भूल थापा दिल्या घरकुलाच्या सर्वेक्षणाला येत्या काही दिवसात नगरपंचायत कडून सुरुवात करण्यात आली नाही तर संघर्ष समितीकडून आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला निवेदनात शिवाजीनगर शांतीनगर इंदिरा वस्ती नरसोबा मारुती प्रभाग क्रमांक दहा शहरातील सर्व प्रभागातील घरकुल लाभार्थ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
