
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी विभागातील गावांमधील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असुन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी साप, विंचु, यांसारखे सरपटणारे प्राणी बाहेर येत असतात त्यामुळे अंधारात नागरिकांच्या जीवाला निर्माण झाला आहे, शिवाय यावेळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने छोट्या मोठ्या उद्योग धंद्यांना सुद्धा याचा फटका बसत आहे तसेच थ्री फेज वीज पुरवठा रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या जीवाला अत्यंत धोकादायक आहे बऱ्याच वेळी रात्रीच्यावेळी साप, विंचु, शेतातील वीज पुरवठा पेटीमध्ये आढळून येत आहे आणि शेतात जातांना येतांना सरपटणारे प्राणी यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे
तरी तो दिवसभर १२ तास थ्री फेज विज पुरवठा सुरू करुन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यात यावा व सध्या गावांमध्ये तसेच शेतामध्ये बोगस ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येत आहे. ट्रांसफार्मर बसवल्यानंतर लगेच २ ते चार दिवसांत निकामी होत आहे तरी आपण या गंभीर विषयावर लक्ष देऊन बोगस ट्रांसफार्मर बसवणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलने आंदोलन करेल त्यावेळी होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार रहाल असे निवेदन मनसेकडून महावितरणला देण्यात आले.
मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, मनसे राळेगाव तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, खैरी विभाग अध्यक्ष दीपक वरटकर, खैरी शाखा अध्यक्ष भारत निंबूळकर, पिंपरी शाखा अध्यक्ष अनिकेत निंबुळकर, पिंपरी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन बोंडे, संदीप कुटे, हर्षल गव्हानकर, उमेश सरोदे, राहुल उलमाले, राजू राऊत, शुभम दुधेवार, अविनाश बल्की, प्रशांत होरे, धनराज होरे, प्रशांत भेदुरकर, सुनील बोंडे, प्रफुल सांभारे, अतुल नंदुरकर, विलास रोगे, शंकर दातरकर, बंडू दुधेवांर, अनिल वाढई, मंगेश मांदाडे आणि परिसरातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
