
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे राष्ट्रीय विज्ञान दीन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर यांनी सी. वी. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कु. रसिका राऊत हीने सी. वी. रमण यांच्या विषयी माहिती सांगितली. विज्ञान शिक्षक श्री वी. एन. लोडे यांनी विज्ञान प्रयोग सादरीकरण व स्पष्टीकरण केले कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी तथा पी. पी. आसुटकर, आर.एस. वाघमारे, बी. बी. कामडी, वी. टी. दुमोरे, एस. एम. बावणे, एस. वाय. भोयर उपस्थित होते.
