
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर यांचा वाढदिवस दिनांक 10/8/2025 रोजी त्यांच्या निवासस्थानी चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी त्यांची साखरतुला शिक्षक बांधवांकडून करण्यात आली.आमदार अडबाले सर जरी नागपूर विभागाचे आमदार असले तरी पण नागपूर विभागाच्या व्यक्तिरिक्त अमरावती विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.ते जरी नागपूर विभागाचे आमदार असले तरी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह या नात्याने त्यांनी अमरावती विभागातील अनेक वर्षांपासून पडून असलेली कामे मार्गी लावून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय दिला त्यावेळी अमरावती विभागातील प्रतिनिधीची जाणवत असलेली उणीव यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आमदार निवडून आणून भरून काढावी लागते अशी चर्चा तेथे ऐकायला मिळत होती.त्यांना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, प्रांतिक पदाधिकारी,शिक्षक महामंडळाचे पदाधिकारी, माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे सर, खासदार प्रतिभा धानोरकर , आमदार संजय देरकर, आमदार मेश्राम साहेब यांच्या सह अनेक मान्यवर मंडळींनी सरांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी झाली होती.
