
वणी:- परिसरात कोळशाची मोठया प्रमाणावर तस्करी होतेय.यात वाहतूकदार सुद्धा सामील आहे.मात्र पोलीस प्रशासनाने खनिकर्म विभागाचा अहवाल मागितला आहे. यात लालपुलियात स्थायिक असलेल्या वाहतूकदार कंपन्या सहभागी असल्याची कुजबुज आहे. तर लालपुलियात असलेले बडे मासे प्रशासन गळाला लावतील का?हाच खरा प्रश्न आहे. तूर्तास सध्यातरी कोळसा,गौण खनिज चोरी ही प्रशासनाच्या आशीर्वादाने होत असल्याचे दिसते आहे.आतां जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक हे याकडे बघणार की,कसे?हाच मोठा प्रश्न आहे.
गेल्या आठवड्यात वणी पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक माधव शिंदे,व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पेटूर नजीक इस्पात कोळसा खाणीतून येणारे कोळशाची वाहने पकडली होती. तो अहवाल तपास अधिकारी यांनी खनिकर्म विभागाला पाठविला होता. कोळसा भरून असलेले टिप्पर ताब्यात घेईल जरी, मात्र म्होरके अद्याप बाहेरच आहे. यात लोकप्रतिनिधी यांचा दबाव,आणखी काय ,काय? हे जरी असले तरी या तस्करीचे पाळेमुळे लालपुलियात असलेल्या पेट्रोल पंपावर असल्याची चर्चा जोरात आहे. वाहतूक उपशाखा वणी चे सहायक पोलीस निरीक्षक, आणि सोबतीला असलेले कास्तकारांच्या वाहनाला दंड ठोठावत आहे.तर दुसरीकडे खुलेआम तस्करी होत असताना यांना दिसत कसे नाही हाच खरा प्रश्न आहे. तूर्तास कोळसा चोरीचे कनेक्शन हे लालपुलियात असल्याची जोरदार चर्चा लालपुलियात सुरू आहे.आता तपास अधिकारी, आणि कोल व्यावसायिक यांच्यात तडजोड काय होते.ते बघणे महत्वाचे आहे. एकूणच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भूमिका महत्वाची असणार आहे.
