
सहसंपादक : रामभाऊ भोयर
*
विरांगना राणी दुर्गावती यांच्या इंग्रज कालीन आणि मुघलांच्या काळातील युध्दात केलेला संघर्ष हा भारतीय महिला साठी एक प्रेरणादायी इतिहास आहे अशा कर्तृत्ववान विरांगणा राणी दुर्गावती यांच्या शहिद दिना निमित्त राळेगाव विधानसभा क्षेत्रातील आपटी, राळेगाव, आणि वाऱ्हा या गावी जाऊन विरांगणा राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आदरांजली वाहण्यासाठी मा.बळवंतराव मडावी साहेब आणि मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी पुढाकार घेतला होता आणि तो यशस्वी केला* *आदिवासी समाजातील महिला आणि समाजातील दुर्बल घटकांना वैचारिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सामाजिक दायित्व समाजातील लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला राळेगाव विधानसभा क्षेत्रात होत असलेली सामाजिक आणि राजकीय पिळवणूक महिला अत्याचार, शेतकरी आत्यहत्या या विषया कडे आजी माजी लोकप्रतिनिधींच दृर्लक्ष सामान्य व्यक्ती ला व्यतीत करणारे आहे असे दिसून आले आहे.भ्रष्ट प्रशासन गरीबांचे आर्थिक शोषण करत आहे आणि ही पांढरपेशी पुढारी आपली दलाली करण्यात व्यस्त आहे समाजातील लोक यांना माफ करणार नाही ह्या गावा गावातील लोकांच्या प्रतिक्रिया आहे म्हणून आम्ही सामाजिक विचारांची जबाबदारी स्वीकारून राळेगाव विधानसभा क्षेत्रात मा बळवंतराव मडावी साहेब यांना जनतेचा पुढारी म्हणून निवडणुकीत उभे करणार आहोत ही घोषणा आम्ही केली आहे ग्राम स्वराज्य महामंच चे अध्यक्ष मा मधुसूदन कोवे गुरुजी आणि सर्व सामाजिक राजकीय वर्तुळात कार्य करणारी मानसं यांच्या विधानसभा मतदारसंघ राळेगाव यांच्या आढावा बैठकी सुरू झाल्या आहेत आम्ही विधानसभा चे नेतृत्व करत असताना राजकीय पक्षा ची दलाली करण्यासाठी येणार नाही तर जणतेचे पुढारी म्हणून ” आपलं गावं आपलं सरकार ” म्हणून पुढे येणार आहोत अशी चर्चा आज विरांगणा राणी दुर्गावती यांच्या शहिद दिना निमित्त समाज प्रबोधन कार्यक्रमांत करण्यात आली या कार्यक्रमात सहभागी मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा बळवंतराव मडावी साहेब गोंडवाना गणतंत्र परिषद, मा ताराबाई कोटणाके वर्षा आडे वसंतराव सोयाम कविता किनाके प्रल्हाद काळे गुरुजी राहुल वाढवे सुमनबाई इंदिरा बाई संदिप भाऊ कुमरे जी मडावी जी घोडाम जी आणि सर्व वाऱ्हा येथील समाज बांधव उपस्थित होते
