
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव प स अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा शाळेला उपशिक्षणाधिकारी गोडे यांनी भेट दिली. त्यांनी प्रवेशोत्सव तयारीचे अवलोकन केले. ते स्वतः राष्ट्रगीताला हजर होते. त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यापूर्वी मुख्याध्यापक श्री माथनकर यांनी गोडे यांचे स्वागत केले. सोबत असलेले सावनेर शाळेचे मुख्याध्यापक भोयर यांचे स्वागत शिक्षक आसुटकर यांनी केले. सदर गोडे यांनी नवीन प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सोबतच त्यांनी सारथी पुणे मार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत तालुक्यात प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या रसिका राऊत नकुल स्वरुपवार राणू वाढई यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना पुस्तक व खाऊ वाटप करुन परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही एन लोडे यांनी केले. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थिती व प्रवेशोत्सव नियोजन यावर श्री गोडे यांनी समाधान व्यक्त केले व शाळेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री आर एस वाघमारे टी बी लील्हारे बी बी कामडी व्हि टी दूमोरे एस एम बावणे एस वाय भोयर यांनी परिश्रम घेतले.
