
सहसंपादक -रामभाऊ भोयर
नगर पंचायत राळेगाव ची चालू आर्थिक वर्षात कर वसुली मोठया प्रमाणात झाली असल्याचे खुद्द नगर पंचायत कार्यालयाने नुकतेच जाहीर केलें आहे. मात्र या वर्षात राळेगाव शहरातील अनेक प्रभागात मात्र विकास कामे मात्र नाममात्र झाली आहे. नगर पंचायत राळेगाव चे बांधकाम अभियंता मला पहा आणि फूलं वाहा याचं भूमिकेत वावरत असल्याचे दस्तूरखुद्द नगर सेवक व नगर सेविका यांची ओरड आहे हे विशेष..
त्यामध्ये सुद्धा राळेगाव शहरातील डॉ.आंबेडकर चौकातील सिमेंट रस्त्यावर ज्या ठिकाणी डांबर व सिमेंट जोड आहे तेथे मात्र भरावा नसल्याने अनेक दुचाकी चालकाचा तोल जाऊन अपघात होतं आहे याकडे मात्र नगर पंचायत कार्यालयाचे दुर्लक्ष आहे. त्याच प्रमाणे क्रांती चौकात बसवण्यात आलेले सिमेंट गट्टू पूर्णपणे फुटले असून त्यावर सुद्धा अनेक सायकल व दुचाकी चालक पडून अपघात होतं असतात त्यामुळे नगर पंचायत कार्यालय एकीकडे कर वसुली चा गाजावाजा करत असून दुसरीकडे मात्र अनेक प्रभागात विकास कामे मात्र
नाममात्र झाली असून जी कामे झाली ती सुद्धा सुमार दर्जाची असून त्याच्या दुरुस्तीकडे मात्र सोयस्करित्या दुर्लक्ष केले जात असल्यामुळे राळेगाव नगर पंचायत च्या बांधकाम विभागाच्या भोंगळ कामकाजामुळे शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
