
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि.१०/१०/२०२४ ते १६/१०/२००४ या कालावधी मध्ये इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगांव येथे गटशिक्षणाधिकारी राजु काकडे पं.सं.राळेगांव यांच्या विद्यमाने तालुक्यातील सर्वच शिक्षक ‘ बाल लैंगिक शोषण व वैयक्तिक सुरक्षा शिक्षण चे प्रशिक्षण घेणार आहे.
तज्ञ मार्गदर्शक नुपूर लांडगे मॅडम व शांतिलाल रिकिबे सर ,अर्पण संस्था मुंबई हे लाभलेले आहे.
यवतमाळ जिल्हा परिषद आणि अर्पण संस्था,मुंबई संयुक्त विद्यमाने,जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक एवं माध्यमिक शिक्षक,मुख्याध्यापक यांच्यासाठी ‘ बाल लैंगिक शोषणास ‘ प्रतिबंध करणा-या वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दिनांक १०/१०/२०२४ते1१६/१०/२०२४पर्यंत चालणारी ही मोहीम,कार्यरत असलेल्या शाळांमध्ये वैयक्तिक सुरक्षा शिक्षण लागू करू शकेल आणि पालक व प्रौढ भागधारकांसह या विषयावर सत्र आयोजित करू शकतील.तसेच मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी या मोहिमेची मदत मिळेल.
अर्पण ही संस्था,मुंबईसह जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त,भारतीय बाल लैंगिक शोषणाच्या निर्मुलनासाठी काम करणारी,पुरस्कारप्राप्त अशासकिय संस्था (एन.जी.ओ.)आहे.
अर्पण ही भारतातील सर्वात मोठी अशासकिय संस्था आहे जी लहान मुलांसहित व पौढांसाठी सुद्धा बाल लैंगिक शोषण प्रतिबंध आणि हस्तक्षेप प्रशिक्षण सेवा प्रदान करते.२००७पासून अर्पण संस्थेने २०लाख मुलांना व प्रौढांना प्रभावित केले आहे.
मोहिमेच्या या चरणामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कळंब ,राळेगांव,मारेगांव,पांढरकवडा आणि झरीजामणी या तालुक्यात शिक्षकांसाठी हा उपक्रम आयोजित केला आहे.
प्रशिक्षण १०/१०/२०२४ते १६/१०/२०२४ पर्यंत सकाळी १०ते ५ होत असून यात जवळपास१६३७शिक्षक सहभागी होत आहे.
मुल आणि मुलांचे अधिकार ,बाल शोषण आणि बाल लैंगिक शोषणाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव,पोक्सो कायदा आणि तरतुदी या बाबत सविस्तर चर्चा या सत्रात करण्यात आली.
==लैंगिक शोषण टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम==”वैयक्तिक सुरक्षा कार्यक्रम”:-
६ते१६वयोगटातील मुलांसाठी,गोष्टीवर आधारित वैयक्तिक सुरक्षा शिक्षण आणि आॅनलाईन ई लर्न कोर्स परिचय व प्रतिबंधात्मक धडे देऊन तसेच जीवन कौशल्यावर आधारित माहिती देऊन मुलांचे सक्षमीकरण कसे करावे याबाबत प्रस्तुतिकरण करण्यात येईल.
मुलांचे प्रकटीकरण कसे हाताळावे?
प्रकटनाचे प्रकार आणि बाल लैंगिक शोषनाची केस हाताळतांना शिक्षकांनी कोणत्या कौशल्याचा वापर करावा याबाबत अद्ययावत माहितीचे प्रस्तुतीकरण केले जाईल.
या प्रशिक्षणासाठी अर्पण संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक सामली जाधव,सुरज एगडे,शांतिलाल रिकिबे,नुपूर लांडगे,निलय आगलावे,स्वप्निल गायकवाड,मनस्वी कुंडु आणि प्रशांत गीते हे मार्गदर्शन करत आहे.
या प्रशिक्षणामधून आपण ज्या विषयावर बोलु शकत नाही ते बोलण्याचे कौशल्य पालकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेल हे निश्चित आहे.
पोक्सो कायदा व तरतुदी यावर शिक्षक थेट विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार आहे व तातडीने पालक सभेत या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षक चर्चा घडवून आणणार आहे जेणेकरून’ बाल लैंगिक शोषणास प्रतिबंद मिळेल.
शिक्षकांनी प्रतिक्रिया व्यक्त करून प्रतिसाद देऊन प्रशिक्षण प्रभावीपणे घेण्यात आले.
तज्ञ प्रशिक्षक नुपुर मॅडम व रिकिबे सर,अर्पण संस्था मुंबई यांचे धन्यवाद मानून
दि.१०/१०/२०२४ च्या सदर प्रशिक्षणाची सांगता ५.२० ला करण्यात आली.
