
सहसंपादक: रामभाऊ भोयर
कापसाचे दर दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता वाटू लागले अनेक शेतकऱ्यांनी कापसासाठी उसनवारी केली असून भाव कमी मिळत असल्याने उसनवारी कशी फेडावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. दिवाळीपासून कापूस विक्री सुरुवात झाली आहे प्रारंभी कापसाचे दर ७४०० होते त्यानंतर कमी होत गेले असल्याने काही दिवसांनी दरात तेजी येईल असे शेतकऱ्यांना वाटत होते परंतु कापसाला म्हणावा तेवढा भाव काय मिळत नाही. सुरुवातीपासूनच चक्क पणे ४०० रुपयांनी भाव घसरले आहेत सध्या ६ हजार ९०० रुपये क्विंटल पर्यंत कापसाचा भाव पोहोचला त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
तालुक्यात ४५ हजार हेक्टर वर मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जात असून कापसाला भाव चांगला मिळेल हे पाहून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला परंतु या वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला असून यावर्षी शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही निघणे कठीण झाले असल्याने कर्जाची परतफेड कशी करावी या आशेने शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे.मात्र याकडे सतेत असलेल्या शासनाला तसेच स्थानिक असलेल्या लोकप्रतिनिधील शेतकऱ्यांच्या व्यथा दिसत का नाही असा प्रश्न सद्या शेतकरी करताना दिसत आहे.मागील २०१९ निवडणुकीत भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव देऊ असा मोठा गाजावाजा केला असला तरी पाच वर्षे पूर्ण होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने या होणाऱ्या निवडणुकीत शेतकरी धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही हे मात्र विशेष.
दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या कोणत्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे पिकांसाठी केलेली उसनवारी फेडणे शक्य होत नाही विविध अडचणीचा सामना करत शेतकऱ्यांना पिकांची जोपासना करावी लागत आहे
नगदी पीक म्हणून दरवर्षी शेतकरी कापसाची लागवड करतो परंतु शासन शेतीमालाला योग्य भाव देत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर येत नाही
खरीप व रब्बी हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे पिकावरील रोगावर कोणत्या औषधाची फवारणी करायला पाहिजे याबाबत माहिती देणे आवश्यक आहे पण कोणतीच माहिती दिली जात नाही अशी शेतकरी बोलून दाखवत आहे
