राशन अनाजाची मोठ्या प्रमाणात सर्रास काळाबाजारी

प्रमोद जुमडे/हिंगणघाट


विशेष सूत्राकडून माहिती प्राप्त झाली असता त्याची दखल घेऊन स्वतः काही जिमेदार नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती प्राप्त केली की राशन अनाजाची सर्रास अवैध काळा बाजारी चालू आहे असे निर्देशनास आले. राशन अनाज गोरगरीब जनतेस काही अल्प किमतीत मिळते हे सर्वांना माहिती आहे, परंतु या अनाजाची अवैध तस्करी आता समोर आली असून त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे व कोण कोण अधिकारी व कर्मचारी यामध्ये शामील आहे ह्याचा पर्दाफाश होणार असून खूप मोठा काळाबाजार उघड पडणार ह्यात तीळभर पण शंका नाही. गोरगरीब जनतेची सर्रास लूट करण्यासाठी ह्या लुटारू ने आपले काही एजंट सुद्धा पोसलेले आहे ते खेड्या पाड्यावून कंट्रोल धान्य 22ते 25 रुपये अश्या भावाने खरेदी करून 28 ते 30 रुपये पर्यंत ह्या धान्य माफियाला विकतात एक एजंट धान्य गोळा करून 10 – 20 क्विंटल असे छोट्या गाड्यानी त्यांच्या अड्ड्यावर आणून देतात. अशी माहिती मिळाली असून काही पुरावे सुद्धा हाती आले आहे. परंतु हे भामटे इतक्यातच नाही थांबत काही कंट्रोल वाल्याकडून सुद्धा यांची साठ गाठ आहे अशी चर्चा सुद्धा जनमाणसांमध्ये पाहायला मिळाली आहे. लवकरच या सर्व माहितीचा स्फोट होणार आहे व यामध्ये कोण कोण शामील आहे त्याच्या नावाचा सुद्धा खुलासा होणार आहे.