“टेमुर्डा येथे कृषीदुतांनी दिले गुटी कलम निर्मितीवर प्रशिक्षण “

महारोगी सेवा समिती द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत विदर्भातील फळबागेला प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांनी गुटी कलम निर्मितीवर प्रशिक्षण दिले.

फळबाग उत्पादन हा दीर्घकाळ व्यवसाय असल्याने जातीवंत व दर्जेदार कलम निवड अत्यंत महत्त्वाची असते. जातीवंत कलम निर्मितीसाठी मातृवृक्षाच्या पक्व फांदीवर दोन डोळ्यांच्या मध्ये २ ते ३ सें. मी. रुंदीची गोलाकार साल काढावी. ओलसर शेवाळ (स्पॅगनम माँस) घट्ट गुंडाळावे. यावरती १२ x १२ सें. मी. आकाराच्या २०० गेज जाळीच्या पॉलीथीन कागद सुतळीच्या साहाय्याने घट्ट बांधावा. गुटी कलमे बांधल्यानंतर ४ ते ५ आठवड्यांनी मुळ्या येण्यास सुरुवात होते. ६० दिवसांनी मुळांचा रंग तांबडा झाल्यावर गुटीच्या खालच्या बाजुने सिकेटरच्या सहाय्याने काप दयावा. कलमे मातृवृक्षापासून वेगळी करावी.

असे सांगत कृषीदुतांनी दिले गुटी कलमाबाबत गावकऱ्यांना योग्य असे मार्गदर्शन. सदर कार्यक्रम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार कार्यक्रम प्रभारी, डॉ. आर. वी. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन.पंचभाई व डॉ. अनिल भोगावे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या कार्यक्रमात कृषी दुत शिव बंडे, प्रणय शहारे, अथर्व कुरई , महेंद्रप्रताप गौरकर, प्रगत गाडेकर व इतर गावकऱ्यांचा समावेश होता.