
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
भारतीय समाजव्यवस्थेत सामाजिक क्षेत्रात काम करणारे असोत किंवा शासकीय सेवेत काम करणारी माणसं असोत मानवतावादी दृष्टिकोन म्हणून त्यांच्या कार्याची पावती म्हणून अशा व्यक्ती चा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे आणि ती सामाजिकता जोपासण्यासाठी ” ग्राम स्वराज्य महामंच ” सदैव अग्रेसर असतात. म्हणून अक्षय तृतीया या कार्यक्रमात मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ येथे मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मा डॉ विलास कनाके साहेब यांच्या पुढाकाराने मा गजाननराव कनाके साहेब यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून त्यांच्या शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता मा गजाननराव कनाके साहेब पोलिस प्रशासनात कार्यरत असताना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची आवड त्यांना आहे. सामाजिक कार्यात दिन दलित दुबळे आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे हे सामाजिक दायित्व त्यांनी आपल्या सेवेत असताना करतं आहे हे आम्ही त्यांच्या सामाजिक कार्याचे साक्षीदार आहोत नुकतेच त्यांचे यवतमाळ जिल्ह्यातील बिटरगाव पोलीस ठाण्यात प्रमोशन झाले म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन मा डॉ विलास कनाके यांनी पुढाकार घेतला कर्तव्यदक्ष व्यक्ती चा सन्मान झाला पाहिजे म्हणून मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी समाजातील प्रतिष्ठित लोकांना आमंत्रित करून सुंदर छोटेखानी कार्यक्रमात सहभागी मा गजाननराव कनाके साहेब यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या निमित्ताने मा डॉ विलास कनाके यांनी आणि अध्यक्ष महोदय यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर गजाननराव कनाके साहेब यांनी सुंदर एक चित्रपटामधिल गित सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन मा पवार साहेब यांनी मानले
