
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या सूचनेनुसार, तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. विराणी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विशेष कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचा उद्देश महिला, बालक व समाजातील दुर्बल घटकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती देणे तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांची माहिती पोहोचवणे हा होता.
शिबिरात विविध विधीज्ञांनी मौलिक मार्गदर्शन केले:
पी पीअॅड. व्ही. ए. मोंढे मॅडम – ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या अभियानाचे सामाजिक महत्त्व विशद केले.
अॅड. व्ही. व्ही. मुके मॅडम – POCSO कायदा २०१२ अंतर्गत बालकांच्या सुरक्षेच्या तरतुदी स्पष्ट केल्या.
अॅड. व्ही. यू. पंडित साहेब – प्रत्येक बालकाच्या शिक्षणाच्या हक्काचे महत्त्व विशद केले.
मा. आर. डी. माने साहेब – बालकांचे हक्क आणि त्यांचे कायदेशीर संरक्षण यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. यु. एम. पाटील, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, राळेगाव होते. त्यांनी ‘जागतिक लोकसंख्या दिवस’ या पार्श्वभूमीवर वाढती लोकसंख्या, तिचे परिणाम आणि कुटुंब नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच कायदेविषयक साक्षरता ही प्रत्येक नागरिकासाठी किती गरजेची आहे, यावरही त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एल. एस. चिंतकुंटलवार मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन डी. एम. लांबाडे सर, तर आभार प्रदर्शन टी. सी. पाटील सर यांनी केले.या शिबिरामुळे राळेगाव परिसरातील नागरिक, विशेषतः विद्यार्थी व महिलांमध्ये, कायदेविषयक जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढीस लागली असून राष्ट्रीय विधी सेवा योजनांविषयीची माहिती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळाले आहे.
