भाजपा पोंभुर्णाच्या वतीने तालुक्यातील गुणवंत युवकांचे सत्कार


तालूका प्रतीनीधी :- आशिष नैताम


पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील भैरव धनराज दिवसे याने बंगलोर येथे सेस्टोबॉल खेळात कास्यपदक जिकणाऱ्या महाराष्ट्र टीम मध्ये होता त्यांचे वडीलचे पण सत्कार करण्यात आला तसेच घोसरी येथील भूपेश सुनील निमसरकार या युवकांने देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी देशात उद्योजक तयार वाव्हे यासाठी स्टार्टप इंडिया योजना आणली त्यामध्ये आपल्या कल्पकेतून उद्योगाचे प्रेझेंटेशन मध्ये भूपेशनी राज्यात दुसरा आला भविष्यात त्याला त्याचा व्यवसाय उभा करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे अशा दोन्ही युवकांचा शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. भैरव दिवसेंमुळे तालुक्यातील युवकांना खेळण्याची प्रेरणा मिळेल आणि भूपेश निमसरकार अगदी 12 वी शिकलेला मुलगा सुद्धा स्वतःच्या जिद्द चिकाटीने स्वतः उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो यासाठी युवकांनी शिकण्यासारखे आहे.यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, अजित मंगळगिरीवार उपाध्यक्ष न प,राहुल संतोषवर माजी जी प सदस्य, विनोद देशमुख मा उपसभापती, ऋषी कोटरंगे अध्यक्ष्य शहर, हरीश ढवस महामंत्री, ओमदेव पाल महामंत्री, संजय कोडापे नगरसेवक, अविनाश ढोंगे, श्रीकांत वडस्कार उपस्थित होते.