
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे २६ जानेवारी पासून ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खैरी ग्रामपंचायत च्या वतीनेचार दिवसीय शालेय सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. हा सांस्कृतिक कार्यक्रम २६ जानेवारीपासून सुरू होऊन २९ जानेवारी असा चार दिवसाचा सांस्कृतिक कला महोत्सव होता. या कला महोत्सवाचे उद्घाटन राळेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव पवार यांच्या हस्ते होऊन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र काकडे तसेच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखेडे , तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थितीत होते.
या चार दिवसीय सांस्कृतिक कला महोत्सवांमध्ये खैरी गावातील चारही शाळेचे विद्यार्थी तसेच अंगणवाडी व कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद उच्च माध्यमिक केंद्र शाळा, प्राथमिक कन्या शाळा, लोक विद्यालय, यशवंत विद्यालय तसेच कॉन्व्हेंट व अंगणवाडी सहभागी झाल्या होत्या. या सांस्कृतिक कला महोत्सवामुळे खैरी गावातील नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण व कला पहावयास मिळाल्या तसेच सर्वच शाळेच् विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल् ल्या कलागुणांनी नागरिकांना मनमोहीत केले. हे सांस्कृतिक कार्यक्रम चारही दिवस रोज संध्याकाळी सुरू होत होते व रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत चालत होते. या सांस्कृतिक कला महोत्सवात विद्यार्थ्यांनी कथ्थक ,क्लासिकल, गोंडी नृत्य इत्यादी विविध प्रकारचे नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.या चिमुकल्या कलाकारांच्या कार्यक्रमांना गावातील नागरिकांकडून प्रेक्षकांकडून भरपूर असा प्रतिसाद मिळत होता.
या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बालचिमुकल्या कलावंतांनी सर्व प्रेक्षकांना नृत्य व नाटिका व उखाणे सादर करून गावकऱ्यांची मने जिंकली. ह्या कार्यक्रमाचे आयोजन खैरी ग्रामपंचायत ने केले असून त्यांनी हे कार्यक्रम साजरे होण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतचे सरपंच श्रीकांत राऊत, सचिव गजानन भोयर, सदस्य रवींद्र निवल, प्रमोद बोडे, सदस्या सौ. लता पवार, सौ. रमा वनकर, सौ . सरला गवारकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी राहुल मानकर ,स्वप्निल गोपने, विशाल पाटील, बंटी फुलकर ,आकाश शिरसागर यादी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.
