
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोजा जागजई येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हिंमत काळे सर यांची खर्डा येथे बदली झाली असताना त्यांच्या ठिकाणी अजून पर्यंत शिक्षकाची नियुक्ती झालेली नाही या ठिकाणी वर्ग एक ते पाच मध्ये 36 विद्यार्थी पटसंख्या असून एकच शिक्षक सांभाळणे शक्य नाही यामध्ये शेतकरी शेतमजूर गरीब परिवारातील विद्यार्थी शिकत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान होत आहे गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांनी तात्काळ लक्ष देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी खालावणार नाही याची दक्षता घेऊन त्वरित शिक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती तथा पालक वर्ग यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होत आहे गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या लक्षात घेता या ठिकाणी तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती करीत आहे जागजई हे गाव राळेगाव वरून 17 किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी जिल्हा परिषद शाळे, शिवाय शिक्षणासाठी कोणताच पर्याय नाही गटविकास अधिकारी तथा गटशिक्षण अधिकारी यांनी तात्काळ लक्ष वेधून शिक्षकाची नेमणूक करावी अशी विनंती केली आहे
