

प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी आणि परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांना हैरान केलेच शिवाय यामुळे नुकसान सुद्धा प्रचंड प्रमाणात झाले हवामान खात्याने गारपीट व प्रचंड प्रमाण हवेची सुद्धा राहणार असे संकेत मागील काही दिवसांपासून वर्तमानपत्रातून तर वाचायला येतच होते शिवाय सर्व शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या मोबाईलवरून निसर्गाची अवकृपा होणार ही माहिती फिरत होती पण निसर्गाचे नुकसान कोणत्या जगातील वजनमापात बसले नाही निसर्गापुढे झालेले नुकसान हे अगणितच असते एवढे शनिवारच्या झालेल्या गारपिटीमुळे बघायला मिळाले
दुपारपर्यंत सर्वसाधारण ढगाळ असलेले वातावरण अचानक बदलले प्रचंड वेगाने हवेसह गारा सुद्धा होत्या कोणाचे गहू काढायचे होते तर कोणाचा हरभरा पण यातून कोणीही सुटले नाही चार महिने काबाड कष्ट करून पिकवलेले धनधान्यांचे नुकसान उघड्या डोळ्यांनी बघू शकण्यापलीकडे शेतकरी काहीही करू शकला नाही ज्याप्रमाणे एखाद्या धनाड्य व्यक्तीने व्यापार करून घरच्या परतीच्या प्रवासाला आपला झालेला फायदा घेऊन आनंदाने निघतो व वाटेतच अचानक दरोडेखोरांची टोळी येऊन लुटते आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं होते तसाच काहीसा प्रकार शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा झाला काही दिवसात घरी माल येणार व चार महिने जोपासलेल्या पिकाची नासाडी काही क्षणात झाली याला निसर्गाची अवकृपाच म्हणावी लागेल म्हणून जुनी जाणती माणसं नेहमीच म्हणत असतात की शेतीच्या मालाचे पदरी पडेपर्यंत काहीच खरे नसते ती मन यावेळी सत्यात उतरली राज्यात तर संपाचे वारे वाहत असताना या बाबीचे कोणालाही सोयर सुतक दिसत नाही गेल्या अनेक वर्षात रब्बी हंगामात काढलेला विमा भेटला नाही तेव्हा यावेळी विमा कंपनी मेहरबानी करेल का चर्चेचा विषय बनला आहे
चौकट
गहू चना आणि सर्व पिकांचे नुकसान असून यामध्ये टरबुजाचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे मौजा कृष्णापुर येथील समाधान बाबळे यांनी एक हेक्टर टरबुजाची लागवड केली पण शनिवारी पडलेल्या गारपिटीमुळे टरबुजाचा खून केला असेच म्हणायला हरकत नाही हा निसर्गाचा खूनी खेळ अर्धा तास सुरूच होता यामध्ये सरी मारणे ,रोपटी विकत, घेणे महागड्या फवारण्या करून फळधारणा सुद्धा झाली होती पण निसर्गाच्या व कृपेमुळे माझे प्रचंड व लाखो रुपयांचे नुकसान झाले तेव्हा याबाबत कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून झालेल्या नुकसानीची गोळा बेरीज करावी
समाधान बाभळे
कृष्णापुर
