यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आज दिनांक १७ एप्रिल रोजी दुपारी साधारण १२ वाजताच्या सुमारास गोपालनगर परिसरात अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर (सुमारे ४२°C तापमान) ही आग वेगाने पसरत होती, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेची माहिती गोपाल नगर येथील पंकेश पवार यांनी तात्काळ डॉ. कुणाल भोयर यांना फोनद्वारे दिली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन डॉ. भोयर यांनी कोणताही वेळ न दवडता नगरपंचायत C.E.O. यांच्याशी संपर्क साधला आणि अग्निशमन दलाची गाडी त्वरित घटनास्थळी पाठवण्याची व्यवस्था केली.अग्निशमन दल वेळेत पोहोचल्यामुळे आणि तातडीने कारवाई केल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा या भीषण उष्णतेत संपूर्ण गोपालनगर परिसराला आगीने वेढा घालण्याची शक्यता होती.या प्रसंगी प्रकाश खुडसंगे, सागर पिंपरे, संजय भगत तसेच गोपालनगर येथील अनेक नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य केले.प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
