
प्रतिनिधी:लता फाळके / हदगाव
शिवभोजन थाळी चे संचालक तथा शिव – पार्वती भोजनालय चे मालक त्रिभुवन चव्हाण यांनी आपल्या पितृछत्र हरवलेल्या भाचीचा विवाह केला. विवाह प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा त्यांनी शाल व वृक्षाचे छोटे रोपटे देवून सत्कार केला. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या सत्काराची मान्यवरांनी प्रशंसा केली. असे उपक्रम सर्वानी सुरू केले तर शासनाचा वृक्ष लागवड ह्या उपक्रमास सहकार्य होईल तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल अशा भावना सर्वानी व्यक्त केल्या.
या विवाह सोहोळ्यासाठी माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांताताई पाटील, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर , जी. प. सदस्य चितांगराव कदम सर, तहसीलदार दापकर साहेब तसेच वडदकर साहेब, सर्व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी ची उपस्थिती होती. कोरोना चे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा संपन्न झाला.
