
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सीसीआयच्या वतीने आजपासून राळेगाव येथील केंद्रावर हमीदराने कापूस खरेदीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी ३०० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या कापसातील आद्रतेनुसार किमान ७७०० ते ८१०० रुपये दर देण्यात आला आहे.
दरम्यान तालुक्यात गुरुवारपर्यंत राळेगाव केंद्रावर ९३०० व खैरी केंद्रावर ३७०० शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती मिळाली आहे.
सीसीआयकडून शासनाच्या आधारभूत किमतीने कापूस खरेदीसाठी कपास किसान याप वर ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे दिवाळीनंतरही पावसाचा जोर राहिल्याने कापूस खरेदी सुरू केली नव्हती त्यानंतर उघड दीप मिळाल्याने १३ नोव्हेंबर पासून राळेगाव येथे सीसीआयच्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी तीनशे क्विंटल कापसाचे खरेदी करण्यात आलेली शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे
शेतकऱ्यांनी कापूस सूकलेला आणावा
खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणताना तो पुरेसा वाळवूनच न्यावा जास्त आद्रतेच्या कारणामुळे तो रिजेक्ट होणार नाही याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. आठ टक्क्यापर्यंत आद्रता असेल तर शेतकऱ्यांना पूर्ण हमीदराचा लाभ होऊ शकतो कापूस दोन ते तीन दिवस चांगला वाळूनच शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणावा असे आवाहन सीसीआयचे अधिकारी राजकुमार बैरवा यांनी शेतकऱ्यांना केले आहे
