रायगडावरील पुनीत झालेल्या माती भरून आणलेल्या मंगल कलशाचे ढाणकी शहरात रथासह आगमन


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ.


ढाणकी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दि ५ जून २०२३ रोजी रथयात्रेचे आगमन झाले शहरातील सर्व नागरिकांनी व राजकीय प्रतिष्ठित गणमान्य व्यक्तींनी रथयात्रेचे स्वागत केले यावेळी प्रचंड शिवभक्त व जनसंमुदाय उपस्थित होता.

संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे बघितले जाते. भारत देशाला अनेक थोर राजे महाराजे होऊन गेले पण रयतेने केवळ छत्रपती शिवरायांना आपला राजा मानले हे विशेष जिद्दीने चातुर्याने आणि निर्भीडपणे शत्रूला सामोरे जाऊन छत्रपतींनी विजय प्राप्त केला व महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या किल्ल्याचे वैभव आणि समुद्रातील आरमार ही छत्रपती शिवाजी महाराजांची देणगी होय छत्रपतींचे नाव घेताच हजारो तरुण एका जागी येतात हा त्यांच्या पराक्रमाचा जादुई करिष्मा मनावा लागेल मंगल कलश असलेला रथ ढाणकी शहरात येतात जुन्या बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले यावेळी गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी, तरुण, लहान मुलांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली विशेष म्हणजे यावेळी जुने पारंपारिक वाद्य वृंद बघायला मिळाले व सगळ्यांचे आकर्षण सुद्धा राहिले व शिवरायांच्या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. रथयात्रा शहराच्या मुख्य मार्गाने येत असताना माता भगिनींनी सुंदर रांगोळ्या काढून आपला आदरपूर्वक भाऊरुपी नमस्कार समर्पित केला. हा रथ नंतर शहरवासीयांचे दैवत श्री हनुमान मंदिर येथे आल्यानंतर फटाके वाजून रथयात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेले झेंडे तरुणांच्या हाती दिसत होते हनुमान मंदिरात आल्यानंतर काही गणमान्य व्यक्तींनी महाराजांच्या पराक्रमावर प्रकाश टाकला यावेळी ढाणकी शहराचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, आनंदराव चंद्रे, विष्णुदासजी वर्मा, महेश पिंपरवार,रोहित वर्मा, सुनील मांजरे,गणेश सुदेवाड, उमेश योगेवार,श्रीकांत देशमुख व अनेक शिवभक्तांची उपस्थिती होती. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीटरगाव(बू) चे ठाणेदार प्रताप भोस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता