वणीत चोरट्यांचा धुमाकुळ, लोखंडी रॉड च्या हल्लात पत्रकार आसिफ शेख गंभीर जखमी , कायदा व सुव्यवस्था धोक्यात,पत्रकारांवरील जिवघेण्या हल्याचा पत्रकार संघटना करणार निषेध

वणी शहरात सद्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून आता एका पत्रकारावर लोखंडी रॉड ने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना पहाटे पाच वाजताचे सुमारास घडली आहे. तर जखमी आसिफ शेख यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत.
शहरातील गजबजलेल्या वस्तीत गाडगेबाबा चौक परिसरात वास्तव्यास असलेले एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे प्रतिनिधी व न्युज मिडिया पत्रकार असोसिएशन चे माजी अध्यक्ष मो.आसिफ शेख (५२) यांचे दोन माळ्याचे मकान असुन ते वरच्या मजल्यावर राहत होते. आज बुधवारी पहाटे पाच वाजताचे सुमारास चोरट्यांनी आसिफ शेख त्यांचे खालचे घराचे कुलूप फोडुन घरातील पंधरा हजाराची रोकड चोरली व त्यानंतर चोरट्यांनी वरच्या मजल्यावर आपला मोर्चा वळवला यावेळी आसिफ शेख यांना चोरटा दिसताच त्यांनी चोरट्यांला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याने आसिफ शेख यांच्यावर लोखंडी रॉड ने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. आरडा ओरड झाल्यानंतर चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला.
जखमी झालेल्या आसिफ शेख यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असुन उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
शहरात घर फोडी, लुटमार, पाकीटमार, मोठ्या प्रमाणात वाढत असून आता चोरट्यांकडून जिवघेने हल्ले सुरू झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांचा वचक संपला असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. एकीकडे पोलीस प्रशासन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच आहे. आता तर चोरट्यांची एवढी हिंमत वाढली की, चक्क लोखंडी रॉड ने हल्ला चढवून एका पत्रकाराचा जिव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहे. आता तरी पोलिस चोरट्यांचा बंदोबस्त करणार काय? अशी चर्चा रंगु लागली आहे.

पत्रकार संघटना करणार या घटनेचा निषेध…

शहरात मोठ्या प्रमाणात घर फोडी, लुटमार, पाकीट मार सारख्या घटना घडत असतानाच आता पत्रकारांवर जिव घेणा हल्ला झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व घडलेल्या घटनेतील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी शहरातील विविध पत्रकार संघटना निवेदनाद्वारे मागणी करणार आहे.