शिक्षण विभाग राळेगावचे वतीने निपुणोत्सव 2024 चे यशस्वी आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथे 30 एप्रिल रोजी शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निपुणोत्सव 2023 -24 चे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती सभागृह राळेगाव येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील विविध पैलू वर प्रकाश टाकण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेळके साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राळेगाव हे उपस्थित होते
कार्यक्रमाचे उदघाटक केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव व
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रमेश राऊत अधिव्याख्याता डायट डॉक्टर सावरकर सर सन्माननीय सांगळे मॅडम अधिव्याख्याता डायट ICDS चे CDPO श्री विठाळकर साहेब
महेश सोनेकर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटन केशव पवार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
राळेगाव तालुक्यातील दहा ही केंद्रामधील शिक्षक वृंदांचे स्टॉल यांची पाहणी कार्यक्रमाचे उद्घाटक व सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे यांनी केली निपुण भारत अंतर्गत भाषा व गणित या विषयाचे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य व साहित्याचे उत्कृष्ट सादरीकरण शिक्षक वृंदांनी केले.निपुणोत्सव कार्यक्रमांमध्ये भाषा या विषयामध्ये प्रथम क्रमांक रिना अक्कलवार जि.प.उच्च प्रा.शाळा, पिप्री दुर्ग द्वितीय क्रमांक सुनीता धुळे व नीलिमा पाटील जि.प.प्रा .शाळा , दापोरी कसारा तर तृतीय क्रमांक श्री गजानन मेश्राम
*गणित /विज्ञान या विषयामध्ये
प्रथम क्रमांक कु.शुभदा येवले जिल्हा परिषद प्रा.शाळा,कळमनेर
द्वितीय क्रमांक मंगेश कोहळे जिल्हा परिषद शाळा, मंगी तृतीय क्रमांक श्री गजानन मेश्राम जिल्हा परिषद शाळा, तेजनी
उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मानचिन्ह सन्मान वस्त्र व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य व प्रभावी सादरीकरण सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले
निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि गणितीय संख्याज्ञान याकरिता उपयुक्त शैक्षणिक साहित्य असणाऱ्या स्टॉलला प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मूल्यांकन समिती यांच्या मूल्यांकनाद्वारे देण्यात आले तसेच स्टॉल लावणाऱ्या सर्व सहभागी शिक्षक वृंदांचा सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान करण्यात आलेल्या प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळालेल्या शिक्षकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
केशव पवार साहेबांनी व जील्हा शिक्षण प्रशिक्षण येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता , यांनी स्वनिर्मित निर्मित शैक्षणिक साहित्य आणणाऱ्या शिक्षकांचं तोंड भरून कौतुक केलं

प्रवीण देवकते सर नोडल अधिकारी निपुण भारत तसेच श्री प्रवीण कोल्हे सर केंद्रप्रमुख वाढोणा बाजार तसेच श्री प्रशांत चांदोरे सर brc श्री संदीप टुले उत्कृष्ट नियोजन केले .कार्यक्रम यशस्वी करणारे सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख लक्ष्मण ठाकरे सर अंतरगाव जगदीश ठाकरे सर जळका हरिदास वैरागडे ,वरध सतीश आत्राम सर सावरखेडा अनिल वरुडकर सर वडकी सागर धनालकोटवार सर झाडगाव
, नियोजन समिती सजावट समिती
मूल्यांकन समिती मध्ये वसुंधरा माकोडे, संदीप कचवे, सुवर्णमाला जोल्हे जया वाघमारे मॅडम . तालुका स्तरीय गणित तज्ञ मृणालिनी महाजन चावट मॅडम नेताजी विद्यालय
यांनी आपापल्या परीने सोपविलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रशांत चांदोरे बी आर सी तज्ञ यांनी केले
गोविंद धोटे व मुख्यध्यापक दीपक केवटे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे संचालन वसुंधरा माकोडे यांनी केले.त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख यांचाही सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाकरिता मोलाचे सहकार्य करणारे सन्माननीय शेळके साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राळेगाव शुभाष पारधी महेश सोनेकर सर केंद्रप्रमुख राळेगाव सुरेश कुंभलकर सर केंद्रप्रमुख खैरी प्रवीण कोल्हे नोडलं अधिकारी प्रवीण देवकते केंद्रप्रमुख वाढोणा बाजार,प्रशांत चांदोरे सर समन्वयक,संदीप टूले सर सहा. शि.धानोरा कुमुद डाखोरे, दीपेश शेंडे, मेंढे आदींनी परिश्रम घेतले
.