अनेक ठिकाणी सचिवांच्या अनुपस्थितीत सरपंच व अध्यक्षांनी केले ध्वजारोहण

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर सचिवांच्या अनुपस्थितीत झाले ध्वजारोहण सविस्तर वृत्त असे १३,१४,१५ ऑगस्ट २०२२ या काळात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व सरकारी कार्यालय तथा सहकार क्षेत्रातील कार्यालय यांनी तीन दिवस ध्वजारोहण करणे अनिवार्य होते त्या अनुषंगाने सर्व सरकारी कार्यालय तथा सहकार क्षेत्रातील कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले होते परंतु काही ठिकाणी तेव्हाही सचिवांच्या अनुपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले होते तर काही ठिकाणी तर कार्यालय नसल्यामुळे सहकार क्षेत्रावर ध्वजारोहण करण्यात आले नव्हते याचे कारण म्हणजे अजूनही काही सहकार क्षेत्रामध्ये कार्यालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही तर काही सहकारी संस्थेला अजुनही कार्यालय तर नाहीच पण संचालक मंडळाला बसण्यासाठी एक खुर्ची तर नाहीच पण पाणी पिण्यासाठी एक साधा ग्लास सुध्दा नाही अशी परिस्थिती ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची दिसून येत आहे. मात्र यावर कुणीही लक्ष देत नाही. सदर जी परिस्थिती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त १३,१४,१५, ऑगस्टला झाली होती तीच परिस्थिती २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी बघायला मिळाली आहे. या मध्ये सचिवांचा तरी काय दोष ? सहकार क्षेत्रामध्ये एका सचिवाकडे कमीत कमी चार ते पाच गावांचा पदभार देण्यात आला आहे तर पंचायत विभागामध्येही तेच परिस्थिती आहे तिथेही एका सचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतीचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र असो किंवा पंचायत विभाग असो गाव अनेक मात्र सचिव एक अशी परिस्थिती तालुक्यात असल्यामुळे बऱ्याच ग्रामपंचायत मध्ये व सहकार क्षेत्रातील ग्राम विविध कार्यकारी संस्थेवर असो सचिवांच्या अनुपस्थितीत 26 जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले आहे. याला जबाबदार कोण?