खेमकुंड येथे एका ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

वडकी पो स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खेमकुंड येथील( शिंदेपोड) एका ३३ वर्षीय तरुणाने जवळील रोडला असलेल्या गोनमोहराच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज बुधवार दि १६ मार्च रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. किशोर नारायण शिंदे वय (३३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.खेमकुंड येथे राहणाऱ्या किशोर नारायण शिंदे या ३३ वर्षीय तरुणाने गावालगत शिंदे पोड जवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली व आपली जीवनयात्रा संपविली.कुटुंबात नेहमी वाद व्हायचे त्यामुळे किशोर याचे मानसिक संतुलन बरोबर राहत नसल्याने त्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे,कुटुंबात वाद होत असल्याने किशोर हा दारूच्या आहारी जाऊन घरी भांडण तंटे व्हायचे रागाच्या भरात तो दि 15 मार्च चे रात्री घरून निघून गेला होता सकाळी किशोर हा घरी दिसेनासा होताच त्याची शोधाशोध केली असता गावानजीक असलेल्या रोडवलगत झाडाफोवती त्याने गळफास घेतल्याचे नागरिकांच्या निर्देशनात आले या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी वडकी पोलिसांना देतात घटनास्थळी तात्काळ बिट जमादार रमेश आत्राम सह संदीप मडावी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला किशोर शिंदे यांचे पश्चात पत्नी,मुलगा ६ वर्ष,मुलगी १ वर्ष असा आप्त परिवार आहे,रागाच्या भरात किशोरने असे आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून आज आपले कुटुंब पोरके केले आहे,याप्रकरणी पुढील तपास वडकी पो,स्टे करीत आहे.