निगंनुर येथे शासन आपल्यादारी परिसरातील नागरिकांनी घेतला



दि.९ जुन रोज शुक्रवारी सकाळी ११ वाजता योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी याची अंमलबजावणी वेगवान पद्धतीने माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड तहसीलदार डॉ अानंद देऊळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज निगंनुर येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये विविध योजनांचा फायदा निगंनुर येथील सर्कल मधील सर्वसामान्यांना देण्यात आला त्यामध्ये श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, असे एकूण २८७ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले शासन आपल्या दारी प्रकल्प अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात निगंनुर येथे करण्यात आले यावेळी कुषि सहाय्यक डि.बि धुगरे.आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी सुनील दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संतोष सकरघे ए एन एम नेताममँडम रविंद्र बोरचाटे.उमेश सरोदे. ए जी आसणकर.संजय गांधी विभाग मंडळाधिकारी सचिन फटाले.तलाठी खंड १चे प्रकाश कानडे.व खंड २ चे विलास धुळधुळे इत्यादी तलाठी .राहुल भोजने.के जि इगंळे.सुशिल सातदिवे.स्वाती गांवडे.कोतवाल योगेश मारकवार विश्बंर भोगांळे. संतोष जाधव ग्रामपंचायत कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते तर येथील ग्रामविकास अधिकारी व्हि बि बोबडे.सरपंच सुरेश बरडे .
माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे माजी उपसरपंच अंकुश राठोड सदस्य बालाजी महाले देविदास खंदारे , पत्रकार मेनौदिन सौदागर व
इतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. तर येत्या दोन दिवसांत आधार कार्ड नुतणीकरणं, नविनी आधार याचे शिबिर घेण्याचे आवाहन गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे यांनी केले.