नागेशवाडी निंगनूर गावातील पहिला पोलीस कर्मचारी ,ज्ञानेश्वर प्रल्हाद जाधव नाईक याची मुंबई पोलीस म्हणून निवड

प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण)

अतिशय गरिबीतुन शिक्षण घेत काहीतरी करून दाखविण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या युवकाने मिळविले सुयश. गावात राहून सुद्धा फक्त प्रयत्नांच्या जोरावर सरकारी नोकरी मिळवता येते हे सिद्ध ज्ञानेश्वर प्रल्हाद जाधव नाईक यांनी दाखविले .नाईक परिवार आणि गावकरी यांना या गोष्टीचा खुप अभिमान आहे. पुढील वाटचालीस आशीर्वाद देत गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला. पि .भोले अर्जुन नाईक , प्रल्हाद नाईक, माजी उपसरपंच अंकुश राठोड प्रकाश नाईक,अनील नाईक, विठ्ठल नाईक, युवराज नाईक, श्रीनिवास नाईक,आणि मित्र परिवार यांच्यातर्फे गावाच्या सुपुत्राचे कौतुक करण्यात आले.