
ढाणकी येथील सर्व महावितरण कार्यालयातील अधीकारी वर्ग व सर्व कर्मचारी यांनी एकत्र येत आज दिनांक 4. मार्च रोजी कार्यालयात लाईनमन दिवस साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रम मध्ये भारत सरकारने लाईनमन दिवस साजरा करण्याचे ठरविले त्या नुसार आज ढाणकी येते महावितरण सब डिव्हिजन येथे साजरा करण्यात आला आहे. वाघमारे सर ,चव्हाण सर गेडाम सर ,सर रामटेके सर व सर्व लाईनमन कर्मचारी राहून या कार्यक्रम साजरा केला.या कार्यक्रमात उन्हातान्हात वर्षभर अविरत सेवा पुरविणाऱ्या लाईनमन बांधवाचे आभार मानत सत्कार करण्यात आला. वर्षभर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या या लाईनमन बांधवांच्या सत्काराने उर भरून आले.
