
यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये यवतमाळ ६३.६० टक्के दिग्रस ७५.७१ टक्के आर्णी,७२.७६ ,पुसद ६५.८६ टक्के,राळेगांव ७४.०६ टक्के,वणी ७६.८८ तर उमरखेड ६८.९५ टक्के या सातही मतदारसंघात टक्के विक्रमी मतदान झाल्याने प्रशासन या परीक्षेत पास झाले आहे. उद्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून, मतदारांनी कोणाला निवडले ते निकालाद्वारे जाहीर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह जिल्हावासीयांची उत्सुकता ताणली गेली आहे.
२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. महिला, पुरुषांसह युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी या मतदानाच्या प्रक्रियेला भरपूर प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पात्र मतदारांची नोंदणी केली होती. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयोग करण्यात आले. विविध माध्यमांतून मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. जिल्ह्यात विधानसभेला ७५ टक्के मतदान करवून घेण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी ठेवले होते. त्यामुळे यावेळी किती मतदान होते, याची उत्कंठा लागली होती.दिं २० नोव्हेंबर ला बुधवारी सकाळी ७ वाजेपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. काही विधानसभा मतदारसंघात थोडे उशिरा पर्यंत मतदान सुरू होते. त्यावरून मतदानास मिळालेल्या प्रतिसादाचा अंदाज येतो. जिल्ह्यात सातही विधानसभा मतदार संघात यावेळेस सरासरी ७०.८६ टक्के मतदान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यातुलनेत ७०.८६ टक्के मतदान झाल्याने प्रशासन या परीक्षेत पास झाले आहे.
२३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत या सातही विधानसभेचा निकाल लागणार आहे. कोण विजयी
होणार, कोणाला किती मते मिळणार, याचा लेखाजोखा समोर येणार आहे. सध्या तरी मतदान संपल्याने गावा- गावात आकडेमोड करून कोण विजयी होईल, याविषयीच्या शक्यता मांडल्या जात आहेत.
त्यामुळे जिल्ह्याचा निकाल जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
