राष्ट्रिय स्वयंसेवक संघ ढानकी तालुका वर्ष प्रतिपदा कार्यक्रम उत्साहात संपन्न…


स्वार्थ,लोभ, या पासून दूर राहून काम केले पाहिजे आ. डॉ. हेडगेवारजी यांनी सांगितलेल्या मूलमंत्राचे आजही जतन करतात स्वयंसेवक..हे विशेष

प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढानकी


दिनाक १२ एप्रिल ला ढानकी येथे वर्ष प्रतिपदा उत्सव कार्यक्रम शहराचे दैवत श्री हनुमान मंदिर येथे पार पडला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून. आशिष चौधरी
… (विभाग सेवा प्रमुख)हे आमंत्रितीत होते उपस्थिती सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले राष्ट्रीय स्वयम् सेवक संघ किंव्हा स्वयंसेवक कोणत्याही व्यक्ती किंवा ग्रंथ यास गुरू न मानता भगव्या ध्वजालाच गुरुस्थानी मानत असतो तसेच. जिथे नियमितपणे शाखा लागते त्या ठिकाणी स्वयंसेवक भगव्या ध्वजाची विधिवत पूजा करतात तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दरवर्षी एकूण ६ उत्सव होतात त्यातील प्रतिपदा उत्सव अनेक दृष्टीने महत्वाचा उत्सव मानला जातो ज्या वेळी आदरणीय डॉ. हेडगेवारजी यांनी संघाची निर्मिती केली त्यावेळेस अनेक स्वयंसेवकांना वाटत होत की संस्थापक या नात्याने आपणच गुरुस्थानी राहावे कारण परमपूज्य डॉ. हेडगेवारजी यांचे व्यक्ती महत्त्व आदरणीय आणि प्रेरणादायी होते पण स्वयंसेवकांच्या आणि सर्वानुमते व हिंदू संस्कृती ज्ञान, त्याग, आणि सन्यास याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच भगवा ध्वज यालाच गुरुंस्थानी मानले सन १९२५ मध्ये स्थापना झाल्यानंतर लगभग ३ वर्षांनी म्हणजेच १९२८ या वर्षात विविध, कार्यक्रम उत्सव सुरू केले. आणि ही परंपरा आजतागायत अबाधित आहे व भगवा ध्वजाचे स्थान संघामधे सर्वश्रेष्ठ आहे. तसेच एका मनाने काम करून व एकमेकांना सहयोग व योग्य असा समन्वय याचा मेळ घालून समाजाप्रती सेवाभाव अर्पण करायची व भौतिकवाद, भोगवाद या वातावरणापासून दूर राहून तसेच जडवाद समर्पण त्याग सेवा निअहंमकरिता, सहकारिता सहयोग योग्य समन्वय रुपी साधना व एकाग्र चित्ताने सर्वांचा मेळ घालून मानव जीवनाचे व विश्वाचे कल्याण करणे हेच संघाचे ध्येय आणि दिशा आहे. असे यावेळी प्रमुख वक्त्यांनी सांगितले. यावेळी अभिजीत चंद्रे, महेश पिंपरवार, महारुद्र बिबेकर, हिम्मत धवने, गजानन चापके, सुनील येरावार, रुपेश काळकर, शैलेश पेंटेवाड, शुभम तोटेवाड, विनायक राहुलवाड, गणेश गोरेलू, श्रीराम दर्शनवाड, रुपेश कोडगिरवार, सचिन कारंजकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला व विचारधारेला मांनणारा वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.