विठाळा येथे भीम जयंती अतिशय उत्साहात साजरी

दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महामानव, Dr. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वि जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम पंचशील ध्वजारोहन करून गावच्या प्रथम नागरिक सरपंचा सौ. शारदा राजेश राठोड यांच्या हस्ते महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व रमाई महिला मंडळ द्वारे त्रीशरण झाले असता या कार्यक्रमाले ग्रामपंचायत सचिव, पो. पाटील. सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्वच पतिष्ठित नागरिक हजर होते अभिवादन कार्यक्रमा नंतर लगेच पंचशील नवयुक मंडळ, व बाबासाहेब पुतळा समिती व सर्व विठाळा वासी यांच्या संयुक्त विद्यमाने गावाकऱ्यांना जेवण देण्यात आले आणि सायंकाळी 7:30 वाजता गावातील प्रमुख मार्गाने बाबासाहेब यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून रॅली मध्ये पतिष्ठित नागरिक, महिला, पुरुष, युवक, युवती, यांचा मोठया प्रमाणत सहभाग असून सर्वच जाती धर्माच्या युवकांनी मिरवणूक पार पडण्या साठी सहकार्य केले असून दि.18/4/2024 रोजी जंगी भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केले आहे