
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथील तहसील कार्यालयातील तलाठी पदावर कार्यरत असलेले राळेगावचे तलाठी मोहन सरतापे यांना स्वातंत्र्यदिनी आदर्श तलाठी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्या शासन निर्णयानुसार विभागीय निवड समितीने सण २०२१-२२ करिता आदर्श तलाठी पुरस्काराकरिता अमरावती विभागातून पाच तलाठ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये राळेगाव येथील तलाठी मोहन सरतापे यांची आदर्श तलाठी म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना १५ ऑगस्ट २०२२ रोज सोमवारला जिल्हाधिकारी कार्यलयात स्वातंत्र्यदिनी आदर्श तलाठी म्हणून पाच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
