ढाणकी शहरातील पथदिवे दिवसा सुद्धा सुरू सूर्यप्रकाशात पथदिव्यांचे लख्खप्रकाशाची उधळण


प्रतिनिधी: प्रवीण जोशी
ढाणकी


ढाणकी शहरातील मागील काही दिवसापासून दिवसा सुद्धा पथदिवे लख्ख प्रकाश देत आहेत एरवी शासन विद्युत बचतीचे मार्ग ग्राहकांना विविध आधुनिकतेच्या माध्यमातून वर्तमानपत्रातून आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सांगत असते राज्यामध्ये अनेक हजारो वॅट विद्युतची कमी असताना ढाणकी नगरपंचायत हद्दीतील पथदिवे मात्र अगदी दिवसाढवळ्या लख्ख प्रकाशाची मुक्त उधळण करताना बघायला मिळत आहे. अनेक प्रभागातील विद्युत खांबावरील पथदिवे दिवसा चालू असताना तेथील लोकप्रतिनिधी ही बाब नगरपंचायतच्या किंवा संबंधित विभागाच्या लक्षात आणून दयायला पाहिजे पण त्याची भूमिका सुद्धा नरोवा व कुंजोवा अशा प्रकारची दिसते
विद्युत वितरण कंपनी आणि नगरपंचायत च्या कलगीतुऱ्यामुळे व अंतर्गत बंडाळीमुळे अनेक दिवस पथदिवे बंद होते पण बुद्धीची देवता श्री गणराय यांचे विसर्जन होताच त्यांनी ही अडचण मिटवण्याची बुद्धी बहुदा दिली असावी व एवढ्या सतराशे बहात्त्तर समस्यांना सामोरे जात ही अडचण मिटली. असे असताना दिवसा पथदिवे चालू ठेवणे हे कितपत योग्य असे शहरातील जाणकार नागरिकांना वाटत आहे. तसेच अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार व्यवसाय थाटून बसलेले असताना विद्युत वितरण कंपनी त्यांना जादा दर लावते व तशा प्रकारची बिले देऊन वसुली करते व विद्युत चे महत्व पटण्यासाठी जनजागृती सुद्धा करते मग एरवी विजेचे महत्त्व सांगणारे विद्युत वितरण कंपनी सुद्धा ही बाब संबंधित नगरपंचायतच्या लक्षात आणून दिल्यास होणारा अपव्यय थांबेल कारण ही कुण्या एकट्या ची किंवा वैयक्तिक संपत्ती नसून ती देशाची आणि राष्ट्राची संपत्ती आहे त्यामुळे हे माझ्या अखत्यारित येत नाही असे न म्हणता एक जबाबदार देशाचा नागरिक म्हणून ते माझे कर्तव्य म्हणून जर याकडे बघितले व अडचण संबंधित विभागाकडून सोडवून घेतल्यास होणारे नुकसान टळेल. तसे बघता रब्बी हंगामासाठी सिंचन करायचे असल्यास गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना रात्रीला पाणी देण्यासाठी जावे लागते व सतत विजेच्या लपंडावाशी सामना सुद्धा करावा लागतो. पण इथ मात्र अपव्यय होताना दिसत आहे त्यामुळे अशा प्रकारे विद्युत नासाडी थांबणे गरजेचे आहे ज्या अर्थी चालू करण्याची यंत्रणा कार्यरत आहे तर मग पथदिवे बंद होणारी यंत्रणा असेलच की यंत्रणा ही बाहेरगावाहून ऑपरेट होते का?? हा प्रश्न या निमित्ताने समोर येतो की तिथे नगरपंचायत चे कर्मचारी पोचू शकत नाही नेमकी अडचण काय ही सर्वसामान्य जनतेला कळायला मार्ग नाही जितके दिवस पथदिवे दिवसा चालू होते तितक्या दिवसाची खर्ची झालेली विद्युत परत येणार नाही पण बंद करून होणारे भविष्यातील नुकसान तरी टळेल तसेच नगरपंचायत चे कर्मचारी बाजार असल्यास त्या दिवशी करवसुलीसाठी अगदी नियमितपणे जातात त्याची आठवण राहते मग पथदिवे बंद करण्याची आठवण राहू नये या त्यांच्या धोरणामुळे हसावे रडावे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो आहे