वडकी पोलिसांची गुटखा कंटेनर वर कारवाई:३९ लाखाचा गुटखा जप्त

   राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर 

सोमवार दिनांक 9/01/2023 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती वरून वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विनायक जाधव यांनी आपल्या पथकासह वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरी घाटात सापळा रचून कंटेनरला अडविले असता पंचा समक्ष पाहणी केली असता सुगंधित तंबाखू गुटखा हा माल आढळला. सदर कंटेनर वडकी पोलीस स्टेशन मध्ये जमा केले असून पुढील कारवाई कार्यतत्पर ठाणेदार जाधव करीत आहे .
गोपनीय माहिती नुसार, दिल्ली कडुन बंगलोर येथे एक कंटेनर सुगंधित गुटखा तंबाखू घेऊन जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विनायक जाधव यांना मिळाली. त्या गोपनीय माहितीच्या आधारे कार्य तत्पर ठाणेदार जाधव यांनी पोलीस स्टेशन परिसरातील देवधरी घाटा मध्ये सापळा रचून सदर कंटेनर अडवले असता अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर क्रमांक एन एल ०१ ए. ई.६६४४ सदर कंटेनर मध्ये पंचा समक्ष पाहणी केली असता सुगंधित तंबाखू गुटखा, पान मसाला ,गणेश तंबाखू डबल ब्लॅक गुटखा असा एकूण 39 लाख 6 हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून कंटेनर अशोक लेलँड कंपनी यांची किंमत अंदाजे 36 लाख रुपये असा एकूण 75 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला.या वरून पोलीस स्टेशन वडकी येथे अप नंबर 05/2022 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक जगताप , मा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात कारवाई पथक कर्तव्यदक्ष स.पो.नी. विनायक जाधव ,पो.हवा.विनोद नागरगोजे ,पोलीस नाईक विलास जाधव, सचिन नेवारे, अविनाश चिकराम, विजय बसे शंकर अंमलदार अरविंद चव्हाण, शंकर जुमनाके, आकाश कुदुसे ,विकेश ध्यावर्तीवार यांनी केली असून सदर बाबत फ्रुट अँड ड्रग्स चे अधिकारी घनश्याम दंदे यांना माहिती दिली असून ते पोलीस स्टेशन वडकी येथे हजर झालेले असून बातमी लिहेपावेतोवर पुढील कारवाई सुरू होती.