
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामु भोयर (9529256225)
सन्माननीय सभासद ग्राम विविध कार्यकारी संस्था राळेगाव….यांना नम्र पणे सुचित करण्यात येते की….ज्या कर्जदार शेतकरी सभासद वर्गाने राळेगाव ग्रा वि का मार्फत प्रधानमंत्री पीक विमा काढलेला आहे….ज्या शेकऱ्यांच्या पिकांचं सततच्या पावसानं तसेच दिनांक 01/10/2021 शुक्रवार रोजी ढग फुटी सदृष्य पाऊस झाल्याने राळेगाव खंड 1, राळेगाव खंड 2 मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याने….ग्रा वी का सोसायटी ने कर्जदार शेतकऱ्यांचा जो पीक विमा उतरवला आहे….त्याची यादी प्रकाशित करण्यात येत आहे…. संबंधित पीक विमा हा इफको टोकियो कंपनी कडे उतरविला आहे….शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान झाले असल्यास स्वतः याची माहिती ऑनलाइन तक्रार पीक विमा कंपनी कडे नुकसान झाल्याच्या 72 तासात नोंदणी करायची आहे तरी या सुचने सोबत शेतकऱ्यांच्या नावाची यादी तसेच यादी मधील अप्लिकेशन नंबर प्रसिद्ध केला असून त्यांच्या पीक निहाय पीक विमा उतरवल्याची यादी प्रसिद्ध करत आहो…तरी सर्व कर्जदार शेतकरी बंधूंनी याची नोंद घ्यावी,असे आवाहन अध्यक्ष जानरावभाऊ गिरी,उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक
ग्रा.वी.का. सोसायटी राळेगाव ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
