आष्टोना गावाला पुर संरक्षक भिंत बांधा:
गावकऱ्यांची खा.गवळी यांच्याकडे मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

वारंवार येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असुन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गावाच्या सुरक्षिततेसाठी पुर संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी खासदार गवळी यांच्याकडे केली आहे.
राळेगाव तालुक्यातील आष्टोना गावालगत नाला असुन पावसाळ्यात या नाल्याच्या पुराचा गावाला असलेला धोका लक्षात घेवुन गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पुरसंरक्षक भिंत बांधण्यात यावी तसेच गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गावातील सडक रस्त्यांसाठी निधी मंजूर करावा यासाठी गावकऱ्यांनी ग्राम सभेत ठराव घेण्यात येवुन त्याच अनुषंगाने वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार मा. भावनाताई गवळी यांना२१/१०/२०२३ रोजी वाढोना बाजार येथे आष्टोना गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देवुन मागणी केली. यावेळी ग्राम पंचायत सचिव कु. आरती वडुले मॅडम, सरपंचा सौ. अर्चनाताई गोवारदिपे, उपसरपंच शंकर वरघट, ग्रामरोजगार सेवक अमोल गाताडे उपस्थित होते.