कृषीदुतांनी दातपाडी येथील शेतकऱ्यांना बियाणाचे टँग, त्यांचे प्रकार आणि बियांचे वर्गीकरण बद्दल दिली माहिती

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय, कोंघारा येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थीनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमा अंतर्गत दातपाडी येथील शेतकऱ्यांना बियाणाची टॅग व त्यांचे वर्गीकरण कसे असते यासंदर्भात गावातील शेतकरी वर्गाला सविस्तर माहिती दिली. यामध्ये उत्तम प्रतीची बियाणे त्याच्या टॅग च्या प्रकारानुसार कसे निवडावे व टॅगनुसार बियाणाची शुद्धता कशी तपासावी व सत्यप्रत बियाण्याच्या तुलनेत प्रमाणित बियाणे याचा वापर किती करावा व ते खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. कृषी महाविद्यालय कोंघारा येथील RAWE च्या विद्यार्थीनी रासेश्वरी जुमडे, वैष्णवी काळे, सृष्टि गायमुखे, शर्वरी दसोदे, वैष्णवी कोटकर यांनी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणांची खरेदी करावीत. बियाणांची खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व पॉकिटातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यत जपून ठेवावेत. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांचे पाकीट सीलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करावी. पॉकिटावरील बियाणे वापरण्याची अंतिम मुदत व किंमत तपासून घ्यावी. बोगस बियाणांविषयी काही तक्रारी असल्यास जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा. अशी माहिती कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक व वनस्पती शास्त्र विभागाचे विशेषतज्ञ प्रा. पीयूष वासुरके सर यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सविता ढोके मॅम वनस्पती शास्त्र विभागाचे विशेषतज्ञ प्रा. संकेत येलोरे व प्राध्यापिका डॉ. पी. डी. जोगी, कार्यक्रम अधिकारी प्रा. डि. आर. जाधव, आणि प्रा. एन. डी. राऊत, प्रा. एस. एस. धोटे व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.