
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढानकी शहरात भूखंडाचे व्यापक स्वरूप झाले अनेक रोडवर उमरखेड, फुलसावंगी, बिटरगाव(बु)या रस्त्यावर भूखंडाची निर्मिती झाली पण कोणत्याही प्रकारच्या सुविधा या ठिकाणी दिसत नाही. केवळ कागदावरच फोटो काढण्या इतक्या सुविधा या ठिकाणी दिसतात. आणि अशा भूखंडाची विक्री वारेमाप दराने विक्री होत आहे. असुविधा युक्त भूखंडामध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना अनेक समस्यांना व संकटांना सामोरे जावे लागत आहे. ढानकी शहरात आजूबाजूच्या असणाऱ्या भूखंडात छोटे छोटे रहिवास करता येईल अशा भूखंडाची निर्मिती होत असून या मध्ये ज्याप्रमाणे भूखंडाचा व्यवसाय करतात अगदी हुबेहूब काही गुरुजी निवृत्ती घेऊन तर काही कार्यरत असून इतरांमार्फत गुंतवणूक करून छताखाली येऊन भूखंड पाडत आहेत.
अनेक युवक याला आपले उदरनिर्वाहचे साधन व व्यवसाय म्हणून बघतात. तसेच अनेक गुरुजी सुद्धा प्रॉपर्टी ब्रोकरचे काम करत आहे. नियमित पने शाळेत जा त्याच त्या कटकटी यापेक्षा हे काम गुरुजींना बहुदा सोपे वाटत असेल आणि लाख भराच्या पगारात सुद्धा ते समाधीन नसतील म्हणून कदाचित हव्याशी वृत्तीमुळे हे सगळे घडत असेल. ढाणकी शहरात भूखंडाच्या किमती तर अक्षरशः गगनाला भिडल्या. शहरात नागपूर नांदेड सारख्या कि जिथे सर्व सुविधा व शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार करून भूखंड असावा म्हणून अनेक जण खरेदी करतात व तिथे सर्व सुविधा असल्यामुळे काही प्रमाणात फायदा पण होतो. ढाणकी सारख्या ठिकाणी जिथे कोणत्याही सुविधा किंवा शैक्षणिक हब नसताना सुद्धा भूखंडाचे दर मात्र शहरासारखे तेजीत आहेत. याच लोकांनी स्पर्धा निर्माण केली व या स्पर्धेमधून अनेक जण भूखंड खरेदी करतात व हे एवढ्या कितीला विकला आहे असे सांगून त्याच भूखंडाप्रमाणे त्याचे दर ठरवले जातात व इथेच सर्वसामान्यांची लूट होत आहे तेव्हा सर्वसामान्यांनी सावधपणे व तारतम्य ठेवून भूखंडाची खरेदी करणे जरुरी बनले आहे.
शहरी भागातील हे भूखंडाचे जाळे आता ग्रामीण भागातही आढळत असताना ले आउटच्या धंद्यात या आधी ठरलेली मंडळी व्यवसाय करत असत. पण आता चित्र बदलताना बघायला मिळत आहे. दोन-चार गुरुजी किंवा आर्थिक सुबत्ता असलेले नोकरीचा कार्यकाळ पूर्ण होण्या आधीच आपल्या निवृत्तीची घोषणा करून ग्रामीण भागात शेत जमिनी खरेदी करून त्यावर भूखंडाची स्थापना करीत आहे. या आधी ज्ञानदान या पवित्र शिक्षण विभागातील काहींनी इतरांच्या मार्फत अर्थातच खांद्यावर बंदूक ठेवून एकाच्या नावाने हा प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता व ते आता प्रत्यक्षात यात उतरून हे करत असणाऱ्यांनी भूखंडाची अव्वाच्या सव्वा किमतीत विक्री झाल्याने आता काहींना भूखंड निर्मिती करणे हा पूर्ण व्यवसाय बनविला अशाची आयकर विभागाने सखोल चौकशी केल्यास भलेमोठे गुंतवणुकीचे रहस्य उलगडू शकते.
ढाणकी परिसरातील अनेक शाळेतील कार्यरत व सेवानिवृत्त काळ पूर्ण झालेले गुरुजी आणि इतर शासकीय कार्यातील साहेब भूखंड व प्रॉपर्टी दलालीचा व्यवसायात उतरून काम करत असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच जणांनी केलेले भूखंड निर्मिती ही यशस्वी ठरल्याने गुरुजींना सुद्धा भूखंडाची स्वप्न खुनावात आहे. खेडोपाडी कार्यरत असलेल्या गुरुजींना त्या ठिकाणचा सगळा लेखाजोखा अगदी अचूकपणे माहीत असतो कोणत्या व्यक्तीचे शेत घर भूखंड यांचा व्यवहार होणार आहे याची इतिवृत्त गुरुजी संग्रहित करत असल्याचा समजते. खास करून शहरी व खेडेगावात उपलब्ध होत असलेल्या आधुनिकतेला अनुसरून भूखंडात कोणत्याही नागरी सुविधेची कामे झालेली किंवा नाही हे न पाहताच त्यातील खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात येत आहे. नियमाला अनुसरून कामे झालेली नसताना सुद्धा नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत कडून भूखंड मालकाला खरेदी विक्री करण्याकरता असीसमेंट ची नक्कल कोणत्याही प्रकारचे कष्टप्राय काम न करता प्राप्त होत असल्याचे बोलले जाते. नागरी सुविधा नसलेल्या लेआउट मधील प्लॉटच्या विक्रीचा व्यवहार सध्या संबंधित कार्यालयाकडून प्रत्येक प्लॉटचे भाव तोलून मोजून व मनमानी पद्धतीने करण्यात येत आहे. यामुळे प्लॉटची खरेदी केल्यानंतर त्यावर बांधकाम करणाऱ्या सर्व सामान्य सुविधा पासून दुरापास्त राहत आहेत. शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील इत्यादी अस सुविधायुक्त भूखंडामधील प्लॉटच्या व्यवहाराच्या काळ्या बाजाराची सखोल चौकशी झाल्यास मूळ भूखंड मालकासह शासकीय सेवेतील मोठे कर्मचारी कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात.
