ढाणकी: दर्पण पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत



प्रतिनिधी,प्रवीण जोशी ,ढाणकी


दिनांक 31 डिसेंबर रोजी दर्पण पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली.रोख ठोक भूमिका बजावणारे निर्भिड,निष्पक्ष असे कर्तव्य बजावणारे 2021 या वर्षी ढाणकी येथे दर्पण पत्रकार संघाची स्थापणा करणारे संस्थापक अध्यक्ष श्री संजय सल्लेवाड यांची सर्वानुमते दर्पण पत्रकार संघ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून राहुल चौरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सचिव पदी सुनील मांजरे यांची निवड करण्यात आली, सहसचिव पवन बच्चेवार,कोषाध्यक्ष आसिफ खान पठाण,संघटक दिगंबरजी बल्लेवार अशा प्रकारे दर्पण पत्रकार संघ कार्यकारिणी गठित करण्यात आली. यावेळी माजी दर्पण पत्रकार संघ अध्यक्ष डॉ.दिनेश जयस्वाल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ,मनोज राहुलवाड ,दिगांबर शिरडकर,गोपाल गौरवाड,विलास घोडे,शेख इरफान,निरंजन नलगे ई.दर्पण पत्रकार संघाचे सदस्य हजर होते.