
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष आ नानाभाऊ पटोले हे दि 8 जून रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येत आहे, ते वडकी मार्गे राळेगाव येथे 2 वाजता येतील शासकीय कोविड केंद्र राळेगाव येथे भेट देऊन राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी च्या बैठकीस उपस्थित राहतील, 4 वाजता यवतमाळ येथील शासकीय कोविड केंद्र ला भेट देतील, 4:30 वाजता जिल्हाधिकरी यांचे समवेत चर्चा करतील, 5 वा पत्रकार परिषद घेतील, 5:30 वाजता शहर अध्यक्ष व तालुका अध्यक्षांच्या यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथील बैठकीस उपस्थित राहतील व राखीव असा त्यांचा कार्यक्रम आहे, उपरोक्त सर्व कार्यक्रमात कोविड नियमांचे पालन संबंधितांनी करण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष आ डॉ वजाहत मिर्झा यांनी केले आहे
