

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
महाकाल गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी रोजी क्रियान्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिव सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. वरील स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मोरया मंगलम हॉलमध्ये झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉ. अशोकराव उईके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. आशिष महाराज काटे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रा. सौ. वर्षा निकम, उपनगराध्यक्ष आकाश कुटेमाटे, काँग्रेस शहर अध्यक्ष सोनू सद्धीक्की, निमकर, रुग्णसेवक दिलीप डवरे उपस्थित होते. ‘अ’ गटात प्रथम बक्षीस आनंदी शिंदे, द्वितीय बक्षीस प्रणय रिठे तर तृतीय बक्षीस श्रावण जगताप या विद्यार्थ्यांना रोख रक्कम शिवाजी महाराजांची मूर्ती देण्यात आली तर ‘ब’ गटामध्ये प्रथम बक्षीस आदर्श भानखेडे यांना देण्यात आले. द्वितीय बक्षीस कु. तन्वी ओंकार या विद्यार्थिनीला देण्यात आले. तृतीय बक्षीस नितीन येडे यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन महिंद्रा मुठाळ, तर आभार महाकाल गणेश उत्सव मंडळ कळंब अनुप भालेराव व मित्र परिवार यांनी व्यक्त केले.
