राळेगाव तालुका ग्रामसेवक अध्यक्षपदी दीपक धनरे यांची बिनविरोध निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी एन इ 136 राळेगाव शाखा येथील कार्यकारणीची निवड जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार दि. 18 ऑक्टोंबर रोजी राळेगाव पंचायत समिती च्या सभागृहात सहसचिव महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE १३६ jilha शाखेचे प्रविण निकुडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. राळेगाव तालुका संघटना सभेत राळेगाव शाखेची नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना ही सदैव ग्रामसेवकांच्या न्याय हक्कासाठी राज्यामध्ये काम करत असते. ग्रामसेवकांना न्याय मिळवून देणे त्यांच्या अडीअडचणी दूर करणे या सर्व बाबीवर ही संघटना सतत प्रयत्नशील असते. राळेगाव येथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या सभेत राळेगाव ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक धनरे यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदी, राजेश शा. ढगे, जगदीश ध. मडावी ,सचिव सुनील कि.येंगडे , कार्याध्यक्ष संजय रा. झिल्पे , महिला उपाध्यक्ष श्रीमती आरती वडुले , कायदेशीर सल्लागार ठाणेश्वर रा. कडू , अविनाश सु. गाणार , सहसचिव गजानन ना. भोयर , कोषाध्यक्ष प्रवीण श. निकुडे ,प्रमुख मार्गदर्शक अविनाश मानकर , दिनेश फुलमाळी , संघटक मनोज मे. पन्नासे ,किरण खैरे , महिला संघटक श्रीमती. मेघा अ. ओंकार प्रसिद्धी प्रमुख महादेव ई. वडे , शंकर र. मुजमुले यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त ग्रामसेवक पदाधिकाऱ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.