सेवा निवृत्त शिक्षक श्री टापरे सर यांचे कडून जि. प. उ. प्राथमिक शाळा येवती येथे शैक्षणिक साहित्य वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

आदरणीय सेवा निवृत्त शिक्षक श्री. प्रमोदजी टापरे सर यांनी जि. प. उ. प्राथमिक शाळा येवती येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी कशी बाळगायला पाहिजे व शिक्षकांनी विदयार्थ्यासोबत कसे वर्तन ठेवावे हे त्यांनी समजावून सांगितले व आपण आपल्यासाठीच नाही तर इतरांसाठीही काहीतरी समाजाला सहकार्य करावे कोणी अडचणीत असला तर त्याला मदत करावी हे त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले मुलांनी नियमित शाळेत आलेच पाहिजे नियमित अभ्यास केलाच पाहिजे. अशाच इतर काही गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान घोडे सर व श्रीमान खुदसंगे सर यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करून मुलांना प्रोत्साहन दिले.