शहरातील रस्ते झाले चिखलमय शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्याची ही दुर्दशा नगरपंचायत चे दुर्लक्ष

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

सततच्या पावसामुळे शहरातील रस्त्याची दैननिय अवस्था झाली असून शहरातील रस्ते चिखलमय झाले असून याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे शहरात वडकी येवती कडून त्रिमूर्ती मंगल कार्यालयाच्या मागील बाजूला येणारा मुख्य रस्ता हा रहदारीचा असून मुख्य रस्त्या खड्डेमय झाला असून या रस्त्याने पाण्याचे डबके साचलेले आहे त्यामुळे या रस्त्याने येणार जाणाऱ्यांना नाहाक त्रास सहन करावा लागत असून या रस्त्याकडे नगरपंचायत प्रशासना लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तसेच राळेगाव शहरात वार्ड क्रमांक सतरा, गणेश नगर येथील राधानगरीकडे जाणारा रस्ता पूर्णता चिखलमय झाला असून येथील नागरिकांनाही ये-जा करणे कठीण झाले आहे तर दुचाकी चालवणे ही कठीण झाले असून हा रस्ता ताबडतोब दुरुस्ती करून देण्यात यावा या संदर्भात येथील महिलांनी नगरपंचायतीला निवेदन दिले आहे. तसेच वार्ड क्रमांक सहा मधून चौहान प्रट्रोल पंपाच्या मागचाही रस्ता चिखलमय झाला असून या रस्त्यावर असलेल्या नालीवरील सिमेंटच्या ढोल्याला मोठे भगदाड पडले असून येथील अपघात होण्याची भीती व्यक्त होत असून येथील सिमेंट ढोला काढून नवीन ढोला टाकण्यात यावा तसेच वार्ड क्रमांक सात चौहान लेआऊट ते केंढे ले आऊट पर्यंत रस्ता चिखलमय झाला असून नगरपंचायतीने या रस्त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.